TRENDING:

Ameesha Patel: राजपाल यादवनंतर अमिषा पटेलही जेलमध्ये जाणार? अजामीनपत्र वॉरंट जारी, प्रकरण काय?

Last Updated:
Amisha Patel Non-Bailable Warrent: अभिनेता राजपाल यादवला ९ कोटींच्या प्रकरणात तिहार जेलची हवा खावी लागल्यानंतर, आता 'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
advertisement
1/9
राजपाल यादवनंतर अमिषा पटेलही जेलमध्ये जाणार? अजामीनपत्र वॉरंट जारी, प्रकरण काय?
बॉलिवूडमध्ये सध्या 'चेक बाऊन्स' आणि कायदेशीर कारवाईचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. अभिनेता राजपाल यादवला ९ कोटींच्या प्रकरणात तिहार जेलची हवा खावी लागल्यानंतर, आता 'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
advertisement
2/9
वारंवार समन्स बजावूनही कोर्टात हजर न राहणाऱ्या अमिषाला मुरादाबाद न्यायालयाने मोठा दणका दिला असून, तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. यामुळे आता अमिषाला कोर्टात हजर व्हावंच लागेल, अन्यथा पोलीस तिच्या दारात धडक देऊ शकतात.
advertisement
3/9
हे प्रकरण २०१७ सालातील एका लग्नसोहळ्याशी संबंधित आहे. मुरादाबादमधील 'ड्रीम व्हिजन' इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी हा खटला दाखल केला होता.
advertisement
4/9
त्यांच्या दाव्यानुसार, अमिषाला एका शाही विवाहसोहळ्यात डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यासाठी तिला ११ लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून देण्यात आले. मात्र, ऐन कार्यक्रमाच्या वेळी अमिषाने तिथे येण्यास नकार दिला आणि आयोजकांची नाचक्की झाली.
advertisement
5/9
जेव्हा पवन वर्मा यांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा अमिषाकडून टाळाटाळ करण्यात आली. बराच काळ लोटल्यानंतर तिने काही रक्कम परत केली, पण उर्वरित पैशांसाठी दिलेला चेक जेव्हा बँकेत टाकला, तेव्हा तो बाऊन्स झाला.
advertisement
6/9
पैसेही गेले आणि अपमानही झाला, यामुळे संतापलेल्या वर्मा यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात रखडलेले आहे.
advertisement
7/9
अमिषाला आजवर अनेकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कधी शूटिंगचं कारण तर कधी वकिलांची अनुपस्थिती, यामुळे ती हजर राहत नव्हती. कोर्टाच्या संयमाचा बांध आता सुटला असून, "न्यायालयाची अवहेलना खपवून घेतली जाणार नाही," अशा कडक शब्दांत ताकीद देत वॉरंट काढण्यात आलं आहे.
advertisement
8/9
न्यायालयाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मार्च २०२६ रोजी निश्चित केली आहे. जर अमिषा या तारखेला हजर झाली नाही, तर पोलिसांना तिला अटक करून कोर्टात उभं करावं लागेल.
advertisement
9/9
राजपाल यादव यांच्यानंतर अमिषाचं नाव अशा वादात आल्यामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या आर्थिक व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ameesha Patel: राजपाल यादवनंतर अमिषा पटेलही जेलमध्ये जाणार? अजामीनपत्र वॉरंट जारी, प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल