TRENDING:

'त्याला आधीच कळालं होतं की...', झुबीन गर्गच्या निधनाच्या 6 महिन्यांनी पत्नीचा मोठा खुलासा, सांगितली गायकाची मोठी भीती

Last Updated:
Zubeen Garg Death: झुबीनच्या निधनानंतर सहा महिन्यांनी त्याची पत्नी गरिमा गर्ग हिने त्याच्याबद्दल एक असा खुलासा केला आहे, ज्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
advertisement
1/10
झुबीन गर्गच्या निधनाच्या 6 महिन्यांनी पत्नीचा मोठा खुलासा, सांगितली गायकाची मोठी भीती
आसामचा लाडका आणि 'या अली' फेम प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हादरला होता. सप्टेंबर २०२५ मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या एका दुर्दैवी घटनेत झुबीनचा मृत्यू झाला होता.
advertisement
2/10
पण त्याचा मृत्यू हा अपघात होता की घातपात? याबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले होते. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजही तपास सुरूच आहे. दरम्यान, झुबीनच्या निधनानंतर सहा महिन्यांनी त्याची पत्नी गरिमा गर्ग हिने त्याच्याबद्दल एक असा खुलासा केला आहे, ज्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
advertisement
3/10
नुकतंच आसामध्ये पंचायत आजतक हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गरिमा गर्ग सहभागी झाली होती. यावेळी झुबीनच्या आठवणीत ती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
4/10
झुबीनला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात कोणत्या गोष्टीची भीती वाटत होती? यावर बोलताना ती म्हणाली, "गेल्या काही वर्षांपासून झुबीन नेहमी एकच गोष्ट बोलायचा, 'मला जर कधी कशाची भीती वाटली असेल, तर ती म्हणजे वेळेची.'"
advertisement
5/10
गरिमाच्या मते, झुबीनला काळाच्या वेगाची जाणीव झाली होती. आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे त्याला कदाचित कळलं होतं. "त्याच्या मनात असं का यायचं, हे मला तेव्हा समजलं नाही. पण त्याने अल्पावधीतच आपली आई, बहीण आणि जिवलग मित्राला गमावलं होतं.
advertisement
6/10
एकामागून एक धक्के बसल्यामुळे तो आतून कोलमडला असावा. कदाचित त्याला काळ आपल्यालाही लवकर घेऊन जाईल, असा संकेत आधीच मिळाला होता," अशा शब्दांत गरिमाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
7/10
१९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये पोहत असताना झुबीनचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला सिंगापूर पोलिसांनी यात कोणताही संशयास्पद प्रकार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे प्रकरण 'साधासुधा अपघात नसून हा स्पष्टपणे खून आहे' असा दावा करून खळबळ उडवून दिली.
advertisement
8/10
आसाम सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. या प्रकरणात झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, ऑर्गनायझर श्यामकानू महंता यांच्यासह ७ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
9/10
गरिमा गर्ग आणि झुबीनच्या चाहत्यांनी या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची मागणी केली असून सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे आणि १९ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
advertisement
10/10
दरम्यान, आसाम सरकारने बोकाखात येथे झुबीन गर्गचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. "झुबीनला न्याय मिळावा हीच आमची एकमेव इच्छा आहे," असे गरिमाने नमूद केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याला आधीच कळालं होतं की...', झुबीन गर्गच्या निधनाच्या 6 महिन्यांनी पत्नीचा मोठा खुलासा, सांगितली गायकाची मोठी भीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल