TRENDING:

Weather Alert: 30 जानेवारीला वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीच्या हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: जानेवारी अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
30 जानेवारीला वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीच्या हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हवामानात संमिश्र बदल पाहायला मिळत आहेत. जानेवारीअखेर थंडीचा जोर कमी होत असून किमान तापमानात काहीशी वाढ होत आहे. मुंबईसह ठाणे परिसरातील हवामान पुढील काही दिवस कोरडे व ढगाळ राहील. तर 30 जानेवारी रोजी कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यातील हवामान जानेवारीच्या शेवटच्या दिवसांत मुख्यतः निरभ्र, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, तर किमान 23 अंश सेल्सिअस असेल. सकाळी हलके धुके राहू शकते आणि दुपारनंतर कडक ऊन पडण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान कोरडे, अंशतः ढगाळ आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल 35 अंश सेल्सिअस राहील. दिवसा उबदार आणि रात्री सुखद थंडीचा अनुभव येईल. हवामानात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांनी आरोग्य काळजी घणे आवश्यक आहे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान कोरडे, सुखद आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसा हवामान उबदार असून, गुरुवार प्रमाणे आज देखील तापमान स्थिर राहील. शुक्रवारी किमान तापमान 20 अंश तर कमाल 34 अंश सेल्सिअस असेल. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34अंश सेल्सिअस असेल,काही ठिकाणी अचानक ढगाळ हवामानामुळे तुरळक ढग दिसू शकतात.
advertisement
5/5
बदलापूर मधील हवामान सुखद व अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. गुरुवार पेक्षा आज किमान तापमानात घट होऊन 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. दिवसभरात कोरडे आणि हलके वारे वाहतील. शहापूर आणि मुरबाड शहरातील किमान आणि कमाल तापमान 19 अंश आणि 33 अंशांवर राहील. दिवसा ऊन असून संध्याकाळ व रात्री हवामान सुखद (काही प्रमाणात थंड) असेल. त्यामुळे हे हवामान बाहेर फिरण्यासाठी किंवा शेतीविषयक कामांसाठी उत्तम असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: 30 जानेवारीला वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीच्या हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल