TRENDING:

Weather Alert: 22 जानेवारीला हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मुंबईसह ठाण्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
Weather Alert: 22 जानेवारीला हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला पुन्हा अलर्ट
जानेवारीच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील हवामानात मोठे चढ-उतार होत आहेत. काही भागात थंडी जाणवत असली तरी आता तापमानात वाढ होत आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह ठाण्यात किमान तापमानात वाढ झाली असून सकाळी काहीसा गारठा तर दुपारा उकाडा हैराण करत आहे. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान निरभ्र किंवा अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून तापमानात किंचित घट झाली आहे. सकाळच्या वेळी थोडी थंडी आणि दिवसा उबदारपणा जाणवेल. किमान तापमान 21अंश सेल्सिअस तर कमाल तापमा 30 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि आल्हाददायक असेल. मागील दोन दिवसांपासून गारठा वाढला होता. परंतु, आज किमान तापमानात थोडी वाढ झाली आहे. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल 33 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात बुधवारपासून अचानक हवामान बदलामुळे वातावरण स्वच्छ आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. ज्यात दिवसा ऊबदार आणि रात्री हलकी थंडी जाणवेल. किमान तापमान 20 ते 21अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हवामान स्थिर आहे. गुरुवारी किमान तापमान किंचित घट झाली असून10 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असेल. शहापूर मुरबाड परिसरात हवामान थंड आणि आल्हाददायक राहील. तापमान कमी झाल्याने सकाळी व रात्री थंडी जाणवेल. किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर कमाल 35 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: 22 जानेवारीला हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला पुन्हा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल