Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, रविवारी कसं असेल हवामान?
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाणे-मुंबईसह परिसरातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. 28 डिसेंबर रोजी कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून थंडीचा कडाका वाढला आहे. डिसेंबरअखेर हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. मुंबई, ठाणे परिसरात देखील थंडीचा जोर कायम राहणरा आहे. दुपारी मात्र उकाडा वाढण्याचा अंदाज आहे. 28 डिसेंबरला ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातली हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कल्याण तालुक्यात शनिवार पासून हवामान आल्हाददायक आणि समान राहिल. 28 डिसेंबर रोजी देखील हवामानात तीच स्थिती अनुभवायला मिळेल. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असेल. सकाळच्या वेळी थंडी आणि दाट धुके जाणवेल.
advertisement
3/5
डोंबिवली परिसरात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान सुमारे 12 अंश ते 19 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस पर्यंत असू शकते. ज्यामुळे हवामानात गारठा जाणवेल. थंडीमुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे,
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात आज ढगाळ हवामान आणि दाट धुके असेल. सकाळी हवामान थंडगार असेल, तर दिवसा तापमान वाढून उन्हाचे चटके जाणवतील. कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहील. आज 28 डिसेंबर रोजी किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश राहील. तसेच हवामान बहुतांशी स्वच्छ आणि निरभ्र असेल, दिवसा उबदार आणि रात्री थंडी वाढेल. मुरबाड, शहापूर तालुक्यातील किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, रविवारी कसं असेल हवामान?