Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत अचानक बदलली हवा, मंगळवारी अलर्ट नवा, हवामान अपडेट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मंगळवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. जानेवारीच्या 5 दिवसांत दुसऱ्यांदा हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. नव्या वर्षाची सुरुवातच पावसाने झाल्यानंतर पुन्हा हवा बदलली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात या हवा बदलाचे परिणाम जाणवत आहेत. 6 जानेवारीच्या कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. कल्याण तालुक्यात 6 जानेवारी रोजी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमान 21 अंश तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल. हलके वारे वाहतील. त्यामुळे दिवसा हवामान सुखद आणि उबदार राहील. रोजच्या हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका असू शकतो.
advertisement
3/5
डोंबिवलीमध्ये हवामान साधारणपणे स्वच्छ आणि थंड राहण्याची शक्यता आहे, किमान तापमान 17 अंश तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. हवामान कोरडे राहून थंडी जाणवेल. काही ठिकाणी तापमानात वाढ नोंदवली जाईल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. मंगळवारी हवामान स्वच्छ किंवा अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश तर किमान 20 अंशांवर राहील. बदलत्या वातावरणानुसार बाहेर पडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये मंगळवारी पारा चांगलाच घसरण्याची शक्यता असून हवामान स्वच्छ आणि थंड राहील. किमान तापमान 9 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले जाईल. मुरबाडमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. किमान तापमान 18 अंश तर कमाल 34 अंशांपर्यंत जाईल. शहापूर तालुक्यातील किमान तापमान 16 अंश तर कमाल तापमान 30 अंशांवर राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत अचानक बदलली हवा, मंगळवारी अलर्ट नवा, हवामान अपडेट