TRENDING:

कोकणात फिरण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच, पर्यटनाबाबत मोठा निर्णय

Last Updated:
मे महिन्याची सुट्टी म्हणून अजूनही लोक कोकणाकडे जात आहेत. कोकणतील पर्यटनस्थळांवर फिरण्याचा विचार करत आहेत. तुम्हीही कोकणता जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. (विशाल रेवडेकर/प्रतिनिधी, सिंधुदुर्ग)
advertisement
1/7
कोकणात फिरण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच, पर्यटनाबाबत मोठा निर्णय
सुट्ट्या म्हटल्या की बरेच जण कोकणाकडे धाव घेतात. <a href="https://news18marathi.com/tag/konkan-news/">कोकणातील हिरवीगार झाडं, निळेशार समुद्रकिनारे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात</a>. तुम्हीही कोकणात फिरायचा विचार करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी.
advertisement
2/7
<a href="https://news18marathi.com/tag/tourism/">कोकणात पर्यटकांसाठी जलपर्यटनही उपलब्ध आहे</a>. यात बनाना राईड, स्कूबा डायव्हिंग, पॅरासिलिंग, जेटस्की असे किनारपट्टीवरील साहसी क्रीडा प्रकार यांचा समावेश आहे.
advertisement
3/7
मागील काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर आणि तालुक्यातील अनेक किनारपट्ट्यांवर हे असे साहसी क्रीडा प्रकार सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इथं मोठ्या संख्येनं पर्यटक येतात.
advertisement
4/7
पण कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील हे साहसी क्रीडा प्रकार आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेरीटाईन बोर्डानं तसे आदेश दिले आहेत.
advertisement
5/7
कोकणातील जलपर्यटन 26 मे ते 31 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे. मान्सून तोंडावर आल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
6/7
मान्सून अंदमानात दाखल झाला असून 31 मे रोजी तो केरळात धडकणार आहे. सामान्यपणे दरवर्षी एक जूनला मान्सून केरळात दाखल होतो,  मात्र यंदा एक दिवस आधीच तो केरळात येणार आहे.
advertisement
7/7
महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनचं आगमन थोडं लांबण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
कोकणात फिरण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच, पर्यटनाबाबत मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल