TRENDING:

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली खासगी बस पलटी

Last Updated:
रत्नागिरीमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली खासगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहे. बसमध्ये वीस प्रवासी होते.
advertisement
1/5

2/5
मुंबई- गोवा महामार्गावरील सावर्डे परिसरात हा अपघात झाला आहे. टेंम्पो ट्रॅव्हल्स बस पलटी झाली. या अपघातामध्ये वीस प्रवाशांपैकी सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
advertisement
3/5
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, स्थानिकांच्या मदतीनं अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी डेरवणमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
advertisement
4/5
नाताळ सेलिब्रेशनसाठी ही खासगी बस बोरीवलीहून मालवणला जात होती. मात्र ती मुंबई-गोवा महामार्गावर पलटी झाली. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
advertisement
5/5
अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली खासगी बस पलटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल