बाप्पा पावलो! गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News
- Published by:Priya Lad
Last Updated:
गणेशोत्सव जवळ आला आहे. अनेकांची कोकणात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. पण कोकणात जाताना एक विघ्न मध्ये येत होतं जे आता दूर झालं आहे. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खेड मधील भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील पूल सुरू झाला आहे.
advertisement
2/5
22 जुलै 2024 रोजी नव्याने बांधलेल्या पुलाला भगदाड पडल्यामुळे तब्बल एक महिना या पुलावरून वाहतूक बंद केली गेली होती.
advertisement
3/5
मागील तब्बल एक महिना एकाच पुलावरून वाहतूक सुरू होती तर एक पूल वाहतुकीसाठी बंद होता. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते तब्बल एक महिन्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झांलं.
advertisement
4/5
रॅपिड हार्डिंग सिमेंट वापरून अखेर पुलाची दुरुस्ती करण्यात आली. 21 ऑगस्ट रोजी सकाळपासून या पुलावरून मुंबईच्या दिशेकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
advertisement
5/5
त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही लेन वरून वाहतूक सुरु होणार असल्याने वाहतूक कोंडीला देखील आळा बसणार आहे.