TRENDING:

सतत डोकं खाजवायची 12 वर्षांची मुलगी, केसात उवा म्हणून पालकांनी दुर्लक्ष केलं; काही दिवसांत मृत्यू

Last Updated:
Itching In Head Cause Death : आपल्या डोक्यात किंवा केसात कधी ना कधी खाज येते. ही समस्या तशी सामान्य. यामागे अनेक कारणं असतात. केसांमध्ये धूळ साचणं, केसात घाम येणं, केसात कोंडा होणं आणि केसांमध्ये उवा होणं. पण एका 12 वर्षीय मुलीसाठी मात्र सामान्य वाटणारी ही समस्या जीवघेणी ठरली.
advertisement
1/5
सतत डोकं खाजवायची मुलगी, केसात उवा म्हणून पालकांनी दुर्लक्ष केलं; झाला मृत्यू
एका 12 वर्षांच्या मुलीच्याही डोक्यात खाज येत होती. तिला ती फक्त साधी खाज वाटत होती, तर तिच्या कुटुंबाला उवा. कारण शाळेत जाणाऱ्या मुलांच्या केसात उवा असतातच. त्यामुळे ही समस्या सामान्य समजून तिच्या पालकांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं.
advertisement
2/5
ओडिशाच्या पुरीमधील ही घटना आहे. drjubairxcel नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डॉक्टरांनी या प्रकरणाबाबत सांगितलं आहे. आता मुलीच्या मृत्यूचं कारण काय असू शकतं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
3/5
तर डॉक्टरांनी सांगितलं की रिपोर्टनुसार मुलीच्या मृत्यूच्या कारणाची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञांनी सांगितलं की, उवा हे शक्यतो मृत्यूचं कारण ठरत नाहीत. पण त्याकडे दुर्लक्ष करणं, स्वच्छता न बाळणं, कुपोषण, अॅनिमिया किंवा एखादं इन्फेक्शन झालं आणि त्यावर उपचार केले गेले नाही तर ते धोकादायक ठरू शकतं.
advertisement
4/5
सतत खाजवल्याने तिच्या स्कॅल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेला हानी पोहोचली, तिथं जखमा झाल्या. यामुळे बॅक्टेरिअल इनफेक्शन होतं. याकडे दुर्लक्ष केलं तर हे इन्फेक्शन स्कॅल्पला झालेल्या जखमांमधून रक्तातही पसरतं, याला सेप्सिस असं म्हणतात आणि ते जीवघेणं ठरतं, असं डॉक्टरांनी पोस्टमध्ये सांगितलं.
advertisement
5/5
स्कॅल्पला येणाऱ्या खाजेसह जखम, पू, सूज, ताप हे सामान्य नाही. त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून नका, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सतत डोकं खाजवायची 12 वर्षांची मुलगी, केसात उवा म्हणून पालकांनी दुर्लक्ष केलं; काही दिवसांत मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल