Hair Oil : केसांना मजबूत बनवण्यासाठी हे 4 हेअर ऑईल ठरतात बेस्ट, हेअरफॉल होईल कमी
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
बदललेला ऋतू असो की प्रदूषण, त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आपली त्वचा, केस हेही याला अपवाद नाहीत. त्वचा आणि केस आपल्या निरोगीपणाची साक्ष देतात. त्यामुळे स्त्रिया असोत की पुरुष, केसांच्या आरोग्याकडे आजकाल सगळेच लक्ष देतात. केस चांगले ठेवायचे असतील तर त्यांना तेल लावणं महत्त्वाचं आहे.
advertisement
1/5

केस मुळांपासून चांगले आणि निरोगी असावे असं वाटत असेल तर चार प्रकारची हेअर ऑईल्स वापरणं उपयुक्त ठरतं. त्यामुळे तुमचा हेअरफॉल थांबेल. केस तुटणं, शुष्क होणं या तक्रारीही दूर होतील. त्यात कोंडा होण्याची समस्याही हळूहळू कमी होईल. केसांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी दूर करण्याचा दावा करणारी अनेक उत्पादनं बाजारात मिळतात. आज काही हेअर ऑईल्सची माहिती घेऊया.
advertisement
2/5
जोजोबा ऑईल हे केसांसाठी खूप चांगलं असतं. त्याचा वापर केल्यामुळे केस मजबूत होतात. त्यांचं नीट पोषण होतं. या तेलात भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही असतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केसांना हे तेल लावलं तर केस छान वाढतात. नियमित वापरल्यास केसांच्या तक्रारीही हळूहळू कमी होतात.
advertisement
3/5
ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे केसांना भरपूर अँटिऑक्सिडंट्स मिळतात. हे केसांसाठी सर्वोत्तम तेल मानलं जातं. ऑलिव्ह ऑईलमुळे केसांना त्यांच्या मुळांपर्यंत पोषण मिळतं. त्यामुळे ते वापरण्याचा सल्ला दिला जातो. आंघोळीपूर्वी दोन तास केसांना ऑलिव्ह ऑईल लावून ठेवा आणि नंतर शॅम्पू लावा. त्यामुळे केस छान चमकदार आणि मजबूत होतील.
advertisement
4/5
एरंडेल तेलात भरपूर व्हिटॅमिन ई, प्रोटिन आणि मिनरल असतात. त्यातील विशिष्ट पोषकतत्त्वांमुळे केसात कोंडा होणं, स्कॅल्पच्या तक्रारी दूर होतात. एरंडेल तेलामुळे केसांच्या मुळांजवळ रक्ताभिसरण सुधारतं. हे तेल केसांना मॉयश्चराइज करतं. त्यामुळे या तेलाने केसांना मसाज करुन तीन ते चार तासांनी शॅम्पू लावून आंघोळ करा आणि केसांतील फरक अनुभवा.
advertisement
5/5
खोबरेल तेल हे अनेक वर्षांपासून केसांसाठी सर्वोत्तम मानलं जातं. त्यात भरपूर पोषणमूल्य असतात. केसांसाठी नियमितपणे हे तेल वापरलं असता केसांची वाढ चांगली होते. त्यात अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिव्हायरल घटकही असतात. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. त्यातील फॅटी ॲसिडमुळे केस चमकदार होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hair Oil : केसांना मजबूत बनवण्यासाठी हे 4 हेअर ऑईल ठरतात बेस्ट, हेअरफॉल होईल कमी