Watermenlon : कलिंगड घेताना ही चूक करू नका… आत असू शकतात नजरेला न दिसणारे किडे, जे आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा टरबूज खाल्ल्यानंतर पोटात कळा येणं, उलट्या किंवा जुलाब होण्यासारखे प्रकार घडतात. आपण त्याला उष्णता किंवा अन्नातून झालेली विषबाधा म्हणतो, पण त्याचं खरं कारण टरबूजाच्या आत लपलेले अदृश्य 'किडे' असू शकतात.
advertisement
1/9

मार्च-एप्रिल महिना सुरू झाला की सूर्याचा कडाका वाढू लागतो. रणरणत्या उन्हात गळा सुकायला लागला की, डोळ्यांसमोर येतो तो लालचुटूक, रसाळ आणि गोड कलिंगड. रस्त्याच्या कडेला रचलेले कलिंगड पाहून कोणाचंही मन ते खाण्यासाठी सरसावतं. 92% पाणी असलेला हा फळराजा आपल्याला हायड्रेट ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. आपण मोठ्या आवडीने कलिंगड घरी आणतो आणि फस्त करतो.
advertisement
2/9
पण, कधी विचार केलाय का की, बाहेरून एकदम चकचकीत आणि टवटवीत दिसणाऱ्या या टरबूजाच्या आत मृत्यूचा सापळा असू शकतो? अनेकदा कलिंगड खाल्ल्यानंतर पोटात कळा येणं, उलट्या किंवा जुलाब होण्यासारखे प्रकार घडतात. आपण त्याला उष्णता किंवा अन्नातून झालेली विषबाधा म्हणतो, पण त्याचं खरं कारण टरबूजाच्या आत लपलेले अदृश्य 'किडे' असू शकतात.
advertisement
3/9
कलिंगडमध्ये किडे? हे कसं शक्य आहे?कलिंगडचं कवच तर इतकं जाड असतं, मग त्यात किडे कसे शिरणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ही एक मोठी चूक ठरू शकते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील फळबागांमध्ये सध्या फ्रूट फ्लाय म्हणजेच फळ माशीचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.जेव्हा कलिंगड कच्चं आणि कोवळं असतं, तेव्हा या माश्या त्याच्या मऊ सालीवर अंडी घालतात. या अंड्यातून बाहेर पडणारे लार्वा टरबूजाच्या आत शिरतात आणि लाल गोड गर खाऊन जगतात. बाहेरून कलिंगड चांगलं दिसतं, पण आतून ते सडलेलं असतं.
advertisement
4/9
आरोग्यासाठी मोठा धोकाहैदराबाद आणि आसपासच्या बाजारपेठांमध्ये अशा किडक्या टरबूजांमुळे फ्रूट पॉयझनिंगच्या केसेस वाढत आहेत. एनआरआय-आयपीएम च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, असे किडके कलिंगड खाल्ल्याने लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना गंभीर संसर्ग होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये रुग्णाला तातडीने रुग्णालयात भरती करण्याची वेळ येते.
advertisement
5/9
चकचकीत दिसण्यावर जाऊ नकाआजकाल काही व्यापारी कलिंगड किड्यांपासून वाचवण्यासाठी आणि ते अधिक लाल दिसावे म्हणून घातक कीटकनाशकांचा आणि रसायनांचा वापर करत आहेत. ही रसायनं टरबूजाच्या गरात मिसळतात, ज्यामुळे लिव्हर आणि किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ स्वस्त मिळतंय म्हणून कलिंगड खरेदी करणं तुमच्या खिशाला औषधांच्या खर्चाने भारी पडू शकतं.
advertisement
6/9
चांगलं कलिंगड कसं ओळखावं?कलिंगड खरेदी करताना तेलंगणा फलोत्पादन विभाग आणि एनएचबी ने दिलेल्या या टिप्स नक्की फॉलो कराकलिंगडाच्या सालीवर कुठेही लहान छिद्र, काळे डाग किंवा भेगा असतील तर ते कलिंगड अजिबात घेऊ नका. हे किडे आत शिरल्याचे लक्षण असू शकते.
advertisement
7/9
टरबूजावर हाताने थाप मारल्यावर जर कुरकुरीत किंवा भरीव आवाज आला, तर ते चांगलं आहे. पोकळ आवाज आल्यास ते आतून सडलेलं असू शकतं.कलिंगड उचलल्यावर त्याच्या आकारापेक्षा जड वाटलं पाहिजे. तसेच त्याचा देठ (Stalk) वाळलेला असेल, तर ते नैसर्गिकरित्या पिकल्याचे लक्षण आहे. तसेच साल जास्त मऊ नसावी, ती कडक आणि चमकदार असावी.
advertisement
8/9
कलिंगड हे आरोग्यासाठी अमृत आहे, पण ते निवडताना दाखवलेली सतर्कता तुम्हाला आजारांपासून वाचवू शकते. नेहमी स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा विश्वासाच्या दुकानातूनच फळं खरेदी करा. थोडा जास्त वेळ देऊन फळ तपासून घेणं, हे दवाखान्याच्या चकरा मारण्यापेक्षा कधीही चांगलं.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Watermenlon : कलिंगड घेताना ही चूक करू नका… आत असू शकतात नजरेला न दिसणारे किडे, जे आरोग्यासाठी ठरेल धोकादायक