TRENDING:

'ते कधीच मित्र होऊ शकत नाहीत, कारण...' शाहरुख-सलमानच्या भांडणानंतर सलीम खान यांनी केलेलं शॉकिंग वक्तव्य

Last Updated:
Salman-Shahrukh Friendship: सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी एका जुन्या मुलाखतीत शाहरुख-सलमानच्या नात्यावर असं काही वक्तव्य केलं होतं, जे आजही तितकंच लागू पडतं.
advertisement
1/10
'ते कधीच मित्र होऊ शकत नाहीत', शाहरुख-सलमानबद्दल वडील सलीम खान यांनी केलेलं शॉकिंग वक्तव्य
बॉलिवूडची दुनिया बाहेरून कितीही चकचकीत आणि आकर्षक वाटली. तरीही वास्तवात यामध्ये किती रहस्ये दडली आहेत, हे सामान्य चाहत्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. या क्षेत्रात पडद्यावर कितीही प्रेमाने राहणारे कलाकार, खऱ्या आयुष्यातही तितकेच मैत्रीपूर्ण वागत असतील का असा प्रश्न पडतो.
advertisement
2/10
या इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांमध्ये कोल्ड वॉर आणि भांडणं असल्याचं दिसून आलं आहे. यातीलच एक गाजलेलं भांडण म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान यांचं भांडण.
advertisement
3/10
एकेकाळी 'करण-अर्जुन' म्हणून ओळखली जाणारी ही जोडी एका रात्रीत एकमेकांच्या जीवावर उठली होती. त्यांच्यातील वादावर संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली, अनेक तर्कवितर्क लढवले गेले.
advertisement
4/10
मात्र, अशातच सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी एका जुन्या मुलाखतीत शाहरुख-सलमानच्या नात्यावर असं काही वक्तव्य केलं होतं, जे आजही तितकंच लागू पडतं.
advertisement
5/10
'लहरे रेट्रो'ला दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान यांनी नात्यांमधील गुंतागुंतीवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "प्रेम सिद्ध करण्याची किंवा समजावून सांगण्याची गरज नसते. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी मतभेद असूनही त्याच्यावर प्रेम करू शकता."
advertisement
6/10
स्वतःचं उदाहरण देताना त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या आणि सलमानच्या विचारांमध्ये ५० पेक्षा जास्त फरक असतील, तरीही त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांच्या पत्नीसोबतही त्यांचे अनेक विषयांवर खटके उडतात, पण प्रेम तसूभरही कमी होत नाही. पण जेव्हा विषय शाहरुख आणि सलमानच्या मैत्रीचा आला, तेव्हा सलीम खान यांनी अतिशय प्रॅक्टिकल भूमिका मांडली.
advertisement
7/10
शाहरुख आणि सलमानच्या १८ वर्षांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्यावर संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. त्यावर सलीम खान यांनी टोकाचा प्रश्न विचारला होता, "कसली आलीय मैत्री? दोन तगड्या स्पर्धकांमध्ये कधी मैत्री होऊ शकते का?"
advertisement
8/10
सलीम खान यांच्या मते, दोन सुपरस्टार्समध्ये केवळ शिष्टाचार असू शकतो. ते एकमेकांना भेटल्यावर "कसा आहेस भावा?", "काय चाललंय?", "वाढदिवसाच्या शुभेच्छा!" किंवा "तुझा सिनेमा चालला, अभिनंदन!" असं म्हणू शकतात. पण याला घनिष्ठ मैत्री म्हणणं चुकीचं ठरेल.
advertisement
9/10
त्यांच्या मते, जेव्हा दोन व्यक्ती एकाच खुर्चीसाठी किंवा एकाच शर्यतीत धावत असतात, तेव्हा त्यांच्यात निखळ मैत्री असणं जवळजवळ अशक्य असतं.
advertisement
10/10
सलीम खान यांनी पुढे स्पष्ट केलं की, दोन स्पर्धकांमध्ये व्यावसायिक नातं असू शकतं, पण निस्वार्थ मैत्री असणं कठीण आहे. त्यांच्या या विधानाने तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आज जरी शाहरुख आणि सलमान पुन्हा एकत्र दिसत असले, तरी सलीम खान यांनी मांडलेलं हे मत चित्रपटसृष्टीतील स्पर्धेचं विदारक वास्तव दाखवणारं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ते कधीच मित्र होऊ शकत नाहीत, कारण...' शाहरुख-सलमानच्या भांडणानंतर सलीम खान यांनी केलेलं शॉकिंग वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल