Kakdi Paratha Recipe : नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? स्पेशल बनवा काकडीचे पराठे, संपूर्ण रेसिपी
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
काकडी आहारात खाल्ल्याने आपल्याला शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे तुम्ही ही हेल्दी रेसिपी तुम्ही बनवू शकता.
advertisement
1/7

नाश्त्याला नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्त्याला नवीन पदार्थ हवा असं वाटतं. त्यामुळे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी असे काकडीचे पराठे बनवू शकता.
advertisement
2/7
काकडी आहारात खाल्ल्याने आपल्याला शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे तुम्ही ही हेल्दी रेसिपी तुम्ही बनवू शकता. त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी दिली आहे.
advertisement
3/7
काकडीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य : सुरुवातीला किसलेली काकडी घ्या, गव्हाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक केलेली मिरची, हळद, मीठ, धने पावडर, कोथिंबीर, तेल हे साहित्य लागेल.
advertisement
4/7
काकडीचे पराठे बनवण्याची कृती: सुरुवातीला किसलेली काकडी घ्यायची. त्यात लागेल तेवढे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, जिरे टाकून घ्या. त्यानंतर मीठ, धने पावडर आणि हळद टाकून घ्या.
advertisement
5/7
आता कोथिंबीर टाकून घ्या. त्यानंतर सर्व मिश्रण मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात पाणी लागत असल्यास थोडे पाणी टाकून घ्या आणि योग्य मिश्रण तयार करून घ्या.
advertisement
6/7
यानंतर तुम्ही पराठे तयार करायला घेऊ शकता. सुरुवातीला तवा थोडा गरम होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यावर थोडे तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मिश्रण तव्यावर टाकून ते पसरवून घ्यायचं आहे. नंतर पराठा एका साईडने पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. एका साईडने शिजल्यानंतर पराठा परतवून घ्यायचा आहे.
advertisement
7/7
यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा पराठा शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हेल्दी आणि टेस्टी पराठा तयार होईल. हा पराठा तुम्ही शेंगदाणा चटणी सोबत खाऊ शकता. काकडीचे पराठे बनवताना मिश्रणाची योग्य कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पराठा एका बाजूने पूर्ण शिजल्यानंतरच त्याला परतवून घ्यायचा आहे. या टिप्स वापरल्यास परफेक्ट असे काकडीचे पराठे तयार होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kakdi Paratha Recipe : नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? स्पेशल बनवा काकडीचे पराठे, संपूर्ण रेसिपी