TRENDING:

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा ट्रॅफिक जॅम! लोणावळा घाटात वाहनांच्या लांब रांगा; प्रवासापूर्वी पाहा हे PHOTOS

Last Updated:
पोलिसांनी काही वेळासाठी एका बाजूची वाहतूक थांबवून दुसऱ्या बाजूची संथ झालेली वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
1/7
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक जॅम! लोणावळा घाटात वाहनांच्या लांब रांगा; प्रवासापूर्वी पाहा PHOTOS
शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या जोडून आल्याने पर्यटकांनी मोठ्या संख्येने पुणे,मुंबई आणि लोणावळ्याकडे धाव घेतली आहे. याचा थेट परिणाम मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झाला आहे.
advertisement
2/7
यावेळीही विकेंडला या एक्सप्रेसवेवर प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली आहे. इथे सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
advertisement
3/7
विशेषतः लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.
advertisement
4/7
लोणावळा घाटातील अमृतांजन पूल आणि बोरघाट परिसरात वाहतूक कोंडीची तीव्रता अधिक असल्याने महामार्ग पोलिसांनी विशेष पावले उचलली आहेत. घाटात वाहनांचा भार कमी करण्यासाठी पोलिसांनी 'वन-वे' पद्धत अवलंबली.
advertisement
5/7
पोलिसांनी काही वेळासाठी एका बाजूची वाहतूक थांबवून दुसऱ्या बाजूची संथ झालेली वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी, वाहनांची संख्या प्रचंड असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांची दमछाक होत आहे.
advertisement
6/7
लोणावळा, खंडाळा आणि मावळ परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मात्र या वाहतूक कोंडीमुळे मनस्तापसहन करावा लागत आहे.
advertisement
7/7
महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना संयम राखण्याचे आणि लेन शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शक्य असल्यास प्रवासाचे नियोजन बदलून गर्दीच्या वेळा टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा ट्रॅफिक जॅम! लोणावळा घाटात वाहनांच्या लांब रांगा; प्रवासापूर्वी पाहा हे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल