Weather Alert: महाराष्ट्राच्या वातावरणात बदल, उष्णतेची लाट अन् अवकाळी पाऊसही कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
विदर्भात अवकाळी पाऊस वगळता सर्वत्र पुन्हा एकदा उष्णतेची लाट राहील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. 28 मार्चला विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा मोठे बदल जाणवत आहेत. विदर्भात अवकाळी पाऊस वगळता सर्वत्र पुन्हा एकदा उष्णतेची लाट राहील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. 28 मार्चला विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल 32-36 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात 28 मार्च रोजी उष्ण हवामान पाहायला मिळेल. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश राहील. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये अवकाळी संकटानंतर उष्ण हवामान राहील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील हवामान उष्ण आणि कोरडे राहील. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चढणार आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 32-35 अंश राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणीमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 33-37 अंश तर किमान 20-23 अंश राहील. मागील काही दिवस मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं संकट होते.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये उष्ण हवामान राहील. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 28 मार्च रोजी या परिसरात ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटी पाऊस होईल.
advertisement
7/7
एकंदरीत, 28 मार्चला विदर्भ वगळता राज्यात उन्हाळ्याचा चटका अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे नागरिकांनी तापमान पाहूनच घराबाहेर पडावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्राच्या वातावरणात बदल, उष्णतेची लाट अन् अवकाळी पाऊसही कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट