TRENDING:

Aluminum Foil Vs Butter paper: आरोग्यासाठी काय फायद्याचं, ॲल्युमिनियम फॉईल की बटर पेपर? गरम अन्नपदार्थ कशात पॅक करावेत ?

Last Updated:
Aluminum Foil Vs Butter paper: जेव्हा आपण अन्न गरम करून खाण्याचा किंवा खाद्यपदार्थ पॅक करण्याचा विचार करतो तेव्हा पहिला विचार येतो तो ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपरचा. गरम अन्नपदार्थांसाठी ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर खरच योग्य आहेत का असा विचार आपण कधीच करत नाही. जाणून घेऊयात अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर वापरणं आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे की नाही?
advertisement
1/7
Aluminum Foil Vs Butter paper: आरोग्यासाठी काय फायद्याचं फॉईल की बटर पेपर ?
लहान मुलं असोत की ऑफिसला जाणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या जेवणाच्या डब्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईलचा वापर प्रचंड वाढलाय. मात्र गेल्या काही वर्षात झालेला संशोधनामुळे ॲल्युमिनियम फॉईल वापरणं हे आरोग्यासाठी धोक्याचं असल्याचं दिसून आलंय. म्हणूनच आता ॲल्युमिनियम फॉईलच्या ऐवजी बटरपेपरचा वापर वाढू लागलाय.
advertisement
2/7
मात्र बटरपेपर तरी आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागलाय.जाणून घेऊयात ॲल्युमिनियम फॉईलला पर्याय म्हणून वापरला जाणारा बटर पेपर खरंच फायद्याचा आणि सुरक्षित आहे का ते.
advertisement
3/7
व्हिटॅमिन सी युक्त फळांसाठी किंवा पदार्थांसाठी ॲल्युमिनियम फॉईल ही सुरक्षित नाहीये. जेव्हा व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ किंवा फळं ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळली जातात तेव्हा ती खराब होण्याची भीती अधिक असते.
advertisement
4/7
गरम अन्नपदार्थ हे ॲल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवल्याने किंवा ॲल्युमिनियम फॉईलसहित अन्नपदार्थ गरम केल्याने, उष्णतेमुळे त्यात ॲल्युमिनियम वितळून विरघळण्याचा धोका असतो. अशा स्थितीत हे ॲल्युमिनियम जर आपल्या शरीरात गेलं तर सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.
advertisement
5/7
ॲल्युमिनियम फॉईलला पर्याय म्हणून वापरला जाणारा बटर पेपर हा ॲल्युमिनियम फॉईलच्या तुलनेत आरोग्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून, बर्गर, फ्रँकी, किंवा मिठाईंच्या बॉक्समध्ये बटरपेपरचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून वाढलाय.
advertisement
6/7
ॲल्युमिनियम फॉईलमध्ये जितका वेळ अन्नपदार्थ गरम राहतात तितकाच वेळ ते बटरपेपरमध्ये गरम राहतात. त्यामुळे बटरपेपरमध्ये अन्न ठेवणं हे फायद्याचं ठरू शकतं. कारण त्यात गरमीमुळे कोणताही धातू किंवा रासायनिक द्र्व्य मिसळण्याची शक्यता कमी असते.
advertisement
7/7
बटरपेपर हे आरोग्यासाठी सुरक्षित जरी असले. तरीही त्याचा दीर्घकालीन वापर आरोग्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. अशावेळी दररोज बटरपेपरचा वापर करण्याऐवजी स्टीलच्या डब्यांचा वापर हा तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Aluminum Foil Vs Butter paper: आरोग्यासाठी काय फायद्याचं, ॲल्युमिनियम फॉईल की बटर पेपर? गरम अन्नपदार्थ कशात पॅक करावेत ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल