सकाळी उठताच खा भिजलेला 'हा' ड्रायफूट, वजन-त्वचा-ॲसिडिटीच्या समस्या होतील दूर अन् चेहऱ्यावर येईल ग्लो
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
आजकाल अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये मनुकांचा वापर केला जातो. वाढदिवसाची खीर असो वा रात्रीच्या जेवणातील फ्राइड राइस, मनुकांशिवाय सगळंच अपूर्ण वाटतं, पण तुम्हाला माहीत आहे का, की मनुके खाण्याचे अनेक फायदे आहेत? चला तर मग जाणून घेऊया...
advertisement
1/7

लोकल18 शी बोलताना डॉ. कौशिक विश्वास यांनी सांगितलं की, मनुकांमध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते आणि त्या अतिरिक्त कॅलरीज न वाढवता भूक नियंत्रित करतात. यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
advertisement
2/7
मनुकांमध्ये फायबर असतं, त्यामुळे त्या पाण्यात भिजवून खाल्ल्याने खूप फायदा होतो. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी मनुकांचं पाणी प्यावं.
advertisement
3/7
भिजवलेले मनुके पचनक्रिया सुधारतात, बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतात आणि पोट स्वच्छ ठेवतात.
advertisement
4/7
मात्र, मनुके खाण्याचे काही तोटेही आहेत. मनुकांमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मनुके तुमच्यासाठी चांगले नाहीत. पुरेसं पाणी न पिता जास्त मनुके खाल्ल्यास डिहायड्रेशन आणि अपचन होऊ शकतं.
advertisement
5/7
मनुकांमध्ये खनिजं, व्हिटॅमिन सी, ई असतात आणि कोलेजन उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. यात व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम, पोटॅशियम आणि कॉपरसारखे पोषक तत्वं असतात.
advertisement
6/7
याशिवाय, त्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात, जे उन्हाळ्यात त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवतात आणि तिला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतात.
advertisement
7/7
ॲसिडिटी कमी करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांमध्ये मनुकांचा समावेश करता येतो. मनुकांमध्ये अल्कलाइन गुणधर्म असतात, जे शरीरातील ॲसिडचं प्रमाण सामान्य करण्यास मदत करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सकाळी उठताच खा भिजलेला 'हा' ड्रायफूट, वजन-त्वचा-ॲसिडिटीच्या समस्या होतील दूर अन् चेहऱ्यावर येईल ग्लो