TRENDING:

Dr APJ Abdul Kalam Quotes : 'भारताचे मिसाईल मॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार

Last Updated:
27 जुलै रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉ. अब्दुल कलाम यांना 'Missile Man of India' म्हणून ओळखले जायचे. त्यांनी भारतातील क्षेपणास्त्र विकास आणि ISRO मधील देशाच्या अंतराळ कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान दिले. तेव्हा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी कोट्स जाणून घेऊयात.
advertisement
1/7
'भारताचे मिसाईल मॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार
आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.
advertisement
2/7
संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
advertisement
3/7
एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
advertisement
4/7
तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
advertisement
5/7
स्वप्नं तेव्हा खरी होतात, जेव्हा आपण ती पाहायला सुरुवात करतो : अब्दुल कलाम
advertisement
6/7
एक चांगलं पुस्तक हजार मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालयाइतका मोठा असतो, त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा : अब्दुल कलाम
advertisement
7/7
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही. - अब्दुल कलाम
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dr APJ Abdul Kalam Quotes : 'भारताचे मिसाईल मॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल