TRENDING:

Secret Santa : सिक्रेट सांता बनलात तर गिफ्ट द्यावंच लागणार, पण पुरुषांना द्यावं काय? इथे पाहा गिफ्ट आयडिया

Last Updated:
Secret Santa gift ideas for male colleague : ऑफिसमध्ये नाताळचा सण आला की सर्वांनाच सीक्रेट सांताचा उत्साह असतो. गिफ्ट देण्याची मजा जितकी आहे, तितकीच योग्य गिफ्ट निवडण्याची डोकेदुखीही असते, विशेषतः बजेट कमी असेल तेव्हा. पुरुष सहकाऱ्यांसाठी गिफ्ट निवडताना ते उपयोगी, साधे आणि थोडेसे पर्सनल असावे अशी अपेक्षा असते. तुमचे बजेट तरीही काळजी करण्याची गरज नाही. कमी किमतीतही तुम्ही अर्थपूर्ण आणि छान गिफ्ट देऊ शकता. चला तर मग पाहूया 500 रुपयांखाली पुरुष सहकाऱ्यांसाठी उत्तम सीक्रेट सांता गिफ्ट आयडिया.
advertisement
1/7
सिक्रेट सांता बनलात, गिफ्ट द्यावंच लागणार; पुरुषांना काय द्यावं? इथे पाहा आयडिया
डेस्क ऑर्गनायझर : पेन, नोट्स आणि छोट्या ऑफिस वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी डेस्क ऑर्गनायझर उत्तम पर्याय आहे. यामुळे त्याचा वर्कस्पेस अधिक नीटनेटका दिसतो.
advertisement
2/7
वॉटर बॉटल : स्टील किंवा प्लास्टिकची साधी पण टिकाऊ वॉटर बॉटल आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी उत्तम गिफ्ट ठरते.
advertisement
3/7
मोबाईल स्टँड : ऑफिस कॉल्स, व्हिडीओ मीटिंग्स किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी मोबाईल स्टँड खूपच उपयोगी आहे. हे गिफ्ट ट्रेंडी आणि कामाचे आहे.
advertisement
4/7
सॉक्स किंवा रुमालचा सेट : साधे, चांगल्या दर्जाचे सॉक्स किंवा रुमालांचा सेट हा क्लासिक आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.
advertisement
5/7
परफ्यूम किंवा डिओड्रंट : हलका आणि फ्रेश सुगंध असलेला डिओड्रंट किंवा छोट्या साईजचा परफ्यूम ऑफिससाठी योग्य गिफ्ट ठरतो.
advertisement
6/7
फनी क्वोट कार्डसोबत छोटंसं गिफ्ट : एखादं छोटंसं गिफ्ट आणि त्यासोबत मजेशीर किंवा मोटिवेशनल क्वोट असलेलं कार्ड दिल्यास गिफ्ट अधिक खास वाटते.
advertisement
7/7
डायरी किंवा नोटबुक : मीटिंग नोट्स, टू-डू लिस्ट किंवा वैयक्तिक नोंदींसाठी एक स्टायलिश डायरी उपयोगी ठरते. हे गिफ्ट प्रोफेशनल आणि विचारपूर्वक वाटते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Secret Santa : सिक्रेट सांता बनलात तर गिफ्ट द्यावंच लागणार, पण पुरुषांना द्यावं काय? इथे पाहा गिफ्ट आयडिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल