TRENDING:

Morning Good Habits : 'या' ग्लासभर पाण्याने बदलेल तुमचं आयुष्य; उजळेल सौंदर्य, शरीरही राहील निरोगी!

Last Updated:
Tulsi leaves for health : तुळशीचे रोप तुम्हाला सर्वत्र उपलब्ध असते. हिंदू धर्मात तुळशीळा पूजनीय मानले जाते, त्यामुळे जवळपास प्रत्येक घरासमोर एक तुळस असतेच. आयुर्वेदिक आचार्य देवेंद्र कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, तुळशीचे पाणी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शरीराला नैसर्गिकरीत्या मजबूत बनवते.
advertisement
1/7
'या' ग्लासभर पाण्याने बदलेल तुमचं आयुष्य; उजळेल सौंदर्य, शरीरही राहील निरोगी!
बदलत्या हवामानामुळे अनेकदा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या समस्यांचा प्रादुर्भाव वाढतो. अशावेळी तुम्हा वारंवार ताप येत असेल तर तुळशीची पाणं तुम्ही खाऊ शकता. ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
advertisement
2/7
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सहज तुळशीच्या पाणी पिऊ शकता. यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात ग्लासभर पाणी उकळा. त्यानंतर तुळशीची 10 ते 15 पानं स्वच्छ धुवून त्यात टाका. ते पाणी 10 मिनिटे झाकून ठेवा आणि नंतर गाळून कोमट असेपर्यंत प्या.
advertisement
3/7
तुळशीच्या पानं केवळ चघळण्यापेक्षा तुळशीच्या पानांचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तुळशीमध्ये बॅक्टेरियाविरोधी, विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे ते प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि पचनाच्या तक्रारींही दूर होतात.
advertisement
4/7
तुळशीमध्ये आढळणारे 'युजेनॉल' पोटाची जळजळ आणि सूज कमी करण्यासोबतच पाचक एन्झाइम्स सक्रिय करण्यास आणि भूक वाढवण्यास मदत करते. तुळशीच्या पाण्याचे सेवन मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते.
advertisement
5/7
तुळशीचे पामी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित करून शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण सुधारतं आणि रक्तदाब नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यास मदत करते. तुळशीचं पाणी प्यायल्याने मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते.
advertisement
6/7
तुळशीचं शरीराला आतुन सुधारण्यासोबत बाह्य सौंदर्य खुलवण्यास देखील मदत करतं. ते प्यायल्याने त्वचेवरील पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत होते. तुळशीचं पाणी रक्त शुद्ध करण्याचं काम करते. त्यामुळे त्वचा टवटवीत चमकदार दिसू लागते. याशिवाय केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी देखील ते अतिशय उपयुक्त ठरते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Morning Good Habits : 'या' ग्लासभर पाण्याने बदलेल तुमचं आयुष्य; उजळेल सौंदर्य, शरीरही राहील निरोगी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल