TRENDING:

Gold Silver Prices: सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदीही 3 हजार रुपयांनी महागली; पाहा लेटेस्ट दर

Last Updated:
Gold Silver Prices Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळतात. चला पाहूया आज सोन्या-चांदीचा भाव वाढला की कमी झालाय.
advertisement
1/7
Gold Silver Prices: सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदीही 3 हजार रुपयांनी महागली; पाहा लेटेस्ट दर
नवी दिल्ली : सोनं आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल होत असतात. आज मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळतेय. सकाळी 9 वाजता एमसीएक्सवर 10 ग्राम सोन्याचा भाव 987 रुपयांच्या तेजीसह 156723 रुपयांवर व्यवहार करतोय.
advertisement
2/7
फक्त सोनंच नाही तर चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळतेय. 1 किलो चांदीचा भाव 2966 रुपयांच्या वाढीसह 259428 रुपयांवर एमसीएक्सवर ट्रेड करतोय.
advertisement
3/7
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं आज 17 मार्च रोजी 0.57 टक्क्यांच्या तेजीसह 5,030.60 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करतेय. चांदी 1.19% टक्के वाढीसह 81.64 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करतेय. जोरदार तेजीनंतर आज किरकोळ वाढ पाहायला मिळाली.
advertisement
4/7
तुमच्या शहरात काय सुरूये सोन्याचा भाव : दिल्लीमध्ये आज 22 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव 1,44,440 रुपयांवर आला आहे. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये 1,44,290 रुपयांवर आहे. तसंच कोलकातामध्येही याच किंमती आहेत.
advertisement
5/7
सोन्या-चांदीच्या किंमतीवर एक्सपर्ट्स काय सांगतात : टाइम्सच्या रिपोर्टनुसार, Christopher Wong नुसार, सोन्याच्या किंमतीत शॉर्ट टर्ममध्ये चढ-उतार कायम आहे. कारण बाजार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचे आणि वास्तविक उत्पन्नाच्या भूमिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करत आहे. एक्सपर्ट सांगतात की, गुंतवणूकदार भविष्यातील चलनविषयक धोरणाबद्दल अनिश्चित असल्याने, सध्या सोन्याच्या किमतींमध्ये स्थिरता कमी आणि अस्थिरता जास्त येऊ शकते.
advertisement
6/7
सोन्याच्या किंमती कोसळून जवळपास $5000 पर्यंत आल्या आहेत. कारण वाढती ऊर्जा किंमतीने अमेरिकन डॉलर मजबूत झालाय आणि फेडरल रिझर्व्ह व्यादरात कपात टाळू शकते अशी चिंता वाढलीये. मार्चच्या बैठकीत व्याजदर कपातीची अपेक्षा आता जवळजवळ संपली आहे. तर या वर्षाच्या शेवटी व्याजदर कपातीची शक्यताही सुमारे 80% पर्यंत कमी झाली आहे.
advertisement
7/7
गुंतवणूकदारांमध्ये सतर्कता वाढल्यामुळे गोल्ड ETF होल्डिंग्स या महिन्यात जवळपास 31 टनने कमीये. म्हणजे लोक आपली भागीदारी कमी करताय. अशा प्रकारे चांदीच्या किंमतीही कमी होऊन आता $80 पर्यंत आल्या आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे वाढणाऱ्या महागाईच्या चिंतेमुळे सराफा बाजार दबावाखाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Prices: सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदीही 3 हजार रुपयांनी महागली; पाहा लेटेस्ट दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल