सिद्धार्थ जाधव तब्बल 8 वर्षांनी रंगभूमीवर! साकारणार दुहेरी भूमिका; या दिवशी 'ॲनिमल'चा शुभारंभ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Siddharth Jadhav Animal Natak : अभिनेता सिद्धार्थ जाधवचं ॲनिमल हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल 8 वर्षांनी तो कमबॅक करतोय. कधी आहे नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग?
advertisement
1/7

मराठी इंडस्ट्रीतील सुपरएर्जेटिक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठी तसंच हिंदी सिनेमांनंतर सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार आहे. तब्बल 8 वर्षांनी सिद्धार्थ जाधव मराठी नाटकात काम करतोय.
advertisement
2/7
'ॲनिमल' असं त्याच्या नाटकाचं नाव असून ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे सिद्धार्थ जाधव नाटकात दुहेही भूमिका साकारणार आहे.
advertisement
3/7
या नाटकाचे मुंबईत सलग प्रयोग होणार आहेत. ठाणे, बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड अशा विविध नाट्यगृहांमध्ये 'ॲनिमल'चे सलग प्रयोग सादर होणार असल्याने या नाटकाकडे रंगभूमीप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.
advertisement
4/7
ॲनिमल हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित असून सिद्धार्थ जाधव या प्रयोगात दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे ते या नाटकाचे निर्मातेही आहेत. आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या ‘ताराराम’ या निर्मिती संस्थेची ही पहिली निर्मिती असून, या नाटकातून त्या संस्थेचा रंगभूमीवरील प्रवास सुरू होत आहे.
advertisement
5/7
नाटकाची कथा दत्तू या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून मुंबईत आलेला हा तरुण अभिनेता होण्याचं स्वप्न पाहतो. मात्र शहरातील स्पर्धा, अस्थिरता, नात्यांमधील अंतर आणि मानसिक ताण यांच्या घुसमटीत त्याचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा होत जातो. एका व्यक्तीच्या मनात चालणारी ही झुंज रंगमंचावर एकपात्री शैलीत साकारली जाणार आहे.
advertisement
6/7
सिद्धार्थ जाधव यांच्यासाठीही हा प्रयोग विशेष ठरणार आहे. ते म्हणतात, "हे नाटक मला कलाकार म्हणून नव्याने तपासतं. प्रत्येक प्रयोगासोबत हा प्रवास अधिक खोल होत जातो. सलग वेगवेगळ्या रंगमंचांवर प्रेक्षकांसमोर उभं राहणं म्हणजे प्रत्येक वेळी नवा अनुभव जगण्यासारखं आहे."
advertisement
7/7
सध्या 'ॲनिमल'च्या तालमी जोरात सुरू असून येत्या 19 मार्चला ठाण्याच्या गडकरी रंगायतनपासून या प्रयोगांची सुरुवात होणार आहे. स्वतः महेश मांजरेकर यांनी या नाटकाला संगीत दिले असून, एकपात्री मांडणी आणि सिद्धार्थ जाधव यांचे रंगमंचावरील पुनरागमन यामुळे ‘ॲनिमल’च्या या प्रयोगमालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सिद्धार्थ जाधव तब्बल 8 वर्षांनी रंगभूमीवर! साकारणार दुहेरी भूमिका; या दिवशी 'ॲनिमल'चा शुभारंभ