TRENDING:

SBI मधून 75 लाख रुपयांचं होम लोन घेण्यासाठी किती सॅलरी असायला हवी? पाहा कॅलक्युलेशन

Last Updated:
सध्याच्या काळात घर घेणं खुप कठीण झालंय. अशावेळी होम लोन हे खुप उपयोगी पडतं. पण होम लोमनही आपल्या उत्पन्नानुसार दिले जाते. एसबीआयच्या होम लोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/7
SBI मधून 75 लाख रुपयांचं होम लोन घेण्यासाठी किती सॅलरी असायला हवी? पाहा कॅलक्युलेशन
SBI Home Loan: आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकजण यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. घरं आता एवढी महाग झाली आहेत की, ती कॅशमध्ये घेणं शक्य नाही. यामुळे जास्तीत जास्त लोक हे होम लोनचा आधार घेत असतात.
advertisement
2/7
होम लोनविषयी बोलायचं झाल्यास, रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांच्या कपातीनंतर होम लोनच्या व्याजदरांमध्ये कपात झाली आहे. होम लोनच्या व्याज दरांमध्ये कपात झाल्यामुळे सामान्य लोकांवर ईएमआयचं ओझं कमी झालं आहे. देशातील प्रमुख लेंडर्स 7.10 टक्क्याच्या सुरुवातीच्या व्याजदरावर होम लोन देत आहेत.
advertisement
3/7
भारतीय स्टेट बँक (SBI) देखील आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदरावर होम लोन देत आहे. भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक आता फक्त 7.25 टक्क्याच्या सुरुवातीच्या दरावर होम लोन मिळवू शकतात. चला जाणून घेऊया एसबीआयकडून 30 वर्षांसाठी 7.25 टक्क्यांच्या व्याजदरांवर 75 लाख रुपयांचं होम लोन घेण्यासाठी मंथली सॅलरी किती असायला हवी आणि दरमहा किती ईएमआय येईल.
advertisement
4/7
75 लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी तुमचा पराग किती असायला हवा? : भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना 7.25 टक्क्यांच्या सुरुवातीच्या दरांवर होम लोन देत आहे. एसबीआयकडून 7.25 टक्क्यांच्या व्याजदरावर 30 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी तुमचा पगार जवळपास 1,00,000 रुपये असायला हवा.
advertisement
5/7
या कॅलक्युलेशननुसार, तुमच्या नावावर दुसरं कोणतंही लोन सुरू नसावं. एसबीआयकडून 7.25 टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरावर 30 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचा होम लोन घेतल्यावर तुम्हाला दरमहा जवळपास 50,000 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. होम लोनच्या बाबतीत तुमच्या पगाराचा जवळपास अर्धा भाग हा लोनच्या ईएमआयमध्ये जाते.
advertisement
6/7
कोणती बँक देतेय सर्वाधिक होम लोन : पैसा बाजाराच्या एका लेटेस्ट रिपोर्टनुसार, पब्लिक सेक्टरची बँक ऑफ इंडिया सर्वात कमी म्हणजेच 7.10 टक्क्यांच्या सुरुवाती व्याजदरांवर होम लोन देतेय. या व्यतिरिक्त कॅनेरा बँक 7.15 टक्के, पंजाब नॅशनल बँक 7.20 टक्के, पंजाब अँड सिंध बँक 7.30 टक्क्याच्या सुरुवातीच्या व्यादरावर होम लोन देत आहे.
advertisement
7/7
तुमचं क्रेडिट स्कोअर चांगलं असेल तर बँकेकडून व्याजदरात सूटसाठीही तुम्ही बोलू शकता. अनेकदा चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे बँक तुमच्यासाठी व्याजदरात चांगल्या ऑफर देतात. क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास बँक तुमची लोन रिक्वेस्ट रिजेक्ट करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
SBI मधून 75 लाख रुपयांचं होम लोन घेण्यासाठी किती सॅलरी असायला हवी? पाहा कॅलक्युलेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल