नव्या वर्षात निसर्गरम्य दृश्य पाहत घ्या देवदर्शन; हे आहे बेस्ट डेस्टिनेशन!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
नव्या वर्षात कुटुंबियांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. इथं तुम्ही सुंदर निसर्ग पाहण्यासह विविध मंदिरांचं दर्शनही करू शकता. शिवाय लहान मुलांनादेखील हे ठिकाण प्रचंड आवडेल.
advertisement
1/5

उत्तर प्रदेशच्या हस्तीनापूर भागात आपण विविध निसर्गरम्य ठिकाणं पाहू शकता. या भागात शेकडो विदेशी पक्षी फिरायला येतात. त्यांच्या देखभालीसाठी वनविभागाकडून विशेष व्यवस्था केली जाते. त्यामुळे पर्यटक म्हणून आपण इथं पक्षी पाहण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
advertisement
2/5
हस्तिनापुरात महाभारताची आठवण होते. इथं कर्ण मंदिर, द्रौपदी घाट, द्रौपदी मंदिर, पांडव मंदिर, इत्यादी विविध देवस्थानं आहेत.
advertisement
3/5
हस्तिनापूर जम्मूदीपला गेलात की, तुम्हाला लहान मुलांसाठी बगीचे मिळतील. इथं अनेक पाळणे, खेळण्यातली ट्रेन, ट्रॅक्टर सवारी आणि होडीदेखील आहेत. तिकीट काढून लहान मुलं या खेळांचा आनंद घेऊ शकतात.
advertisement
4/5
अनेकजण मनःशांतीसाठी फिरायला जातात. तुम्हीसुद्धा शांत वातावरणाच्या शोधात असाल, तर हस्तिनापूरचं ध्यान मंदिर आपल्यासाठी योग्य ठिकाण आहे. इथं अनेकजण ध्यानधारणा करतात. त्याचबरोबर इथं अनेक भव्य जैन मंदिरं आहेत.
advertisement
5/5
हस्तिनापूर जम्मूदीपमध्ये एक सुमेरू पर्वत आहे. या पर्वतावर गोल-गोल फिरत तुम्ही 60 फूटांहून अधिक उंचीवर जाऊ शकता. आपण एवढ्या उंचीवर कसे पोहोचलो हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे हे ठिकाण अत्यंत रोमांचक आणि निसर्गरम्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
नव्या वर्षात निसर्गरम्य दृश्य पाहत घ्या देवदर्शन; हे आहे बेस्ट डेस्टिनेशन!