Betel Nut : छोटीशी सुपारी अनेक आजारांवर गुणकारी! जाणून घ्या सुपारी खाण्याचे फायदे
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
हिंदू संस्कृतीत सुपारीला फार महत्व असून अनेक शुभ कार्यात सुपारी विविध कारणांसाठी वापरली जाते. मात्र या लहानश्या सुपारीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून ही सुपारी अनेक आजारांवर गुणकारी ठरते.
advertisement
1/5

दररोज सुपारीचे सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. सुपारी खाल्ल्याने बद्धकोष्ठता तसेच पचनाशी निगडित अनेक समस्या दूर होऊन आरोग्य चांगले राहते.
advertisement
2/5
अनेक लोकांना अल्सरची समस्या असते ज्यामुळे जेवण करताना देखील त्यांना त्रास होतो. तेव्हा जर तुम्हाला अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही सुपारीचे सेवन केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते.
advertisement
3/5
जर तुम्हाला पाठी, सांधेदुखी, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सुपारी खाणे त्यावर उत्तम पर्याय आहे. सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्याला स्नायूंच्या वेदनांपासून आराम देतात.
advertisement
4/5
सुपारीचे सेवन आपल्या दातांसाठी देखील फायदेशीर असते. सुपारी खाल्ल्याने दात मजबूत होतात. तर सुपारीची पावडर दात घासण्यासाठी वापरल्यास दात स्वच्छ होतात.
advertisement
5/5
सदर लेख हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारवर आहे. तेव्हा तुम्हाला कोणता आजार असेल तर सुपारीचे रोजच्या आहारात सेवन करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Betel Nut : छोटीशी सुपारी अनेक आजारांवर गुणकारी! जाणून घ्या सुपारी खाण्याचे फायदे