TRENDING:

Black Raisins Benefits : काळे मनुके खाण्याचे हे 10 फायदे माहितीये? संपूर्ण आरोग्यासाठी आहे लाभदायक

Last Updated:
Black Raisins Benefits In Marathi : सामान्यतः लोक तपकिरी, लाल, हिरवे किंवा सोनेरी रंगाचे मनुके जास्त खातात. परंतु, तुम्ही काळे मनुके खात नसाल तर त्याचाही आहारात समावेश करायला हवा. विशेषत: ज्यांना अशक्तपणा, जास्त केस गळणे किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या आहे. याशिवायही काळ्या मनुक्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. चला जाणून घेऊया काळ्या मनुकामधील पोषक तत्वे आणि त्यांचे आरोग्य फायदे.
advertisement
1/11
काळे मनुके खाण्याचे हे 10 फायदे माहितीये? संपूर्ण आरोग्यासाठी आहे लाभदायक..
पांढरे केस आणि केस गळणे कमी करते : काळ्या मनुकामध्ये केवळ लोहाचे प्रमाण जास्त असते असे नाही, तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील असते. ते शरीरातील खनिजांचे जलद शोषण करण्यास मदत करते आणि केसांचे उत्तमप्रकारे पोषण देखील करते.
advertisement
2/11
ॲनिमिया दूर ठेवते, हिमोग्लोबिन वाढवते : मनुकामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्सचे प्रमाण जास्त असते, हे दोन्ही लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करतात. नियमितपणे मूठभर मनुके खाल्ल्याने अशक्तपणा टाळता येऊ शकतो.
advertisement
3/11
हाडं आणि दात मजबूत करते : काळ्या मनुकामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. काळ्या मनुका खाल्ल्याने हाडं आणि दात मजबूत होतात. रोज 8 ते 10 काळे मनुका खाल्ल्याने हाडे निरोगी आणि तंदुरुस्त राहते.
advertisement
4/11
बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर : काळे मनुके पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. हे पचन सुधारते आणि गॅस, बद्धकोष्ठता, सूज येणे, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते. याचे सेवन केल्याने पोटही चांगले राहते.
advertisement
5/11
कोलेस्ट्रॉल कमी करते : काळ्या मनुका खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. वाईट कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. काळ्या मनुकामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय निरोगी होते. हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
6/11
प्रतिकारशक्ती वाढवते : stylesatlife.com मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, काळ्या मनुकामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, लोह, जीवनसत्त्वे, ऊर्जा, सोडियम यासह अनेक पोषक घटक असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.
advertisement
7/11
रक्तदाब नियंत्रित ठेवते : काळे मनुके खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. रक्तदाब वाढल्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी काळे मनुके खाऊ शकता.
advertisement
8/11
किडनी निरोगी ठेवते : काळे मनुके किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. भरपूर पाणी पिण्यासोबतच कमी कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास किडनी स्टोन दूर होऊ शकतो.
advertisement
9/11
त्वचा तरूण ठेवते : काळ्या मनुकामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात, जे रक्त शुद्ध करतात. यामुळे प्रणालीमधून हानिकारक द्रव, विष, घाण इत्यादी काढून टाकले जातात. या सर्व गोष्टींमुळे त्वचेच्या समस्या जसे मुरुम, पिंपल्स, सुरकुत्या, डाग नाहीशा होतात. रक्त शुद्धीकरणामुळे त्वचाही निरोगी, तजेलदार आणि समस्यांपासून मुक्त होते.
advertisement
10/11
वजन नियंत्रित राहते : रोज सकाळी 5 ते 10 मनुक्यांचे सेवन केल्याने वजन आटोक्यात राहते आणि रक्तातील वाढती शुगर नियंत्रणात राहते. मनुके पाण्यात भिजवून सकाळी खाणे फायदेशीर आहे. गोड पदार्थ, स्मूदी, शेक, डेझर्टमध्ये देखील तुम्ही मनुके टाकू शकता. दुधासोबतही तुम्ही ते खाऊ शकता. काळे मनुके संपूर्ण खा किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधासोबत घ्या.
advertisement
11/11
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Black Raisins Benefits : काळे मनुके खाण्याचे हे 10 फायदे माहितीये? संपूर्ण आरोग्यासाठी आहे लाभदायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल