TRENDING:

Black Salt Benefits : काळ्या मिठात 'हा' 1 पदार्थ टाका, बनेल औषध; या 5 आजारांवर रामबाण उपाय..

Last Updated:
Benefits Of Black Salt : आपल्या स्वयंमापक घरातील अनेक पदार्थ खरं तर औषधी असतात. आयुर्वेदाने अनेक गोष्टींबद्दल आपल्याला माहिती करून दिली आहे. स्वयंपाकघरातील या गोष्टी केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठीही उपयोगी ठरतात. काळे मीठ हा त्यापैकीच एक पदार्थ. आज आम्ही तुम्हाला काळ्या मिठाचे काही जबरदस्त फायदे सांगणार आहोत.
advertisement
1/6
काळ्या मिठात 'हा' 1 पदार्थ टाका, बनेल औषध; या 5 आजारांवर रामबाण उपाय..
काळे मीठ आणि हिंग गुणकारी गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी जेवणाची चव वाढवतात. पण या दोन गोष्टी एकत्र केल्या तर ते आरोग्यासाठी उत्तम औषध ठरते. होय, काळे मीठ आणि हिंग एकत्र घेतल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. आता प्रश्न असा आहे की काळे मीठ आणि हिंग किती फायदेशीर आहेत? कोणत्या समस्यांपासून आराम मिळतो? लखनऊचे बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ. जितेंद्र शर्मा यांनी न्यूज18ला याबाबत सविस्तर माहिती दिली.
advertisement
2/6
पचन व्यवस्थित ठेवा : डॉ. जितेंद्र शर्मा सांगतात की, पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी काळे मीठ आणि हिंग खूप फायदेशीर मानले जाते. वास्तविक, काळे मीठ आणि हिंगामध्ये असलेले गुणधर्म तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते.
advertisement
3/6
मळमळ थांबवते : मळमळण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काळे मीठ आणि हिंग हा उत्तम पर्याय आहे. या दोन गोष्टींचे सेवन केल्याने पचनक्रिया गतिमान होते. उलट्या आणि मळमळण्याच्या समस्येपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी कोमट पाण्यात हिंग आणि काळे मीठ मिसळून प्या.
advertisement
4/6
पोट फुगण्यापासून आराम : तज्ज्ञांच्या मते, हिंग आणि काळे मीठ एकत्र सेवन केल्यास फुगण्याची समस्या कमी होते. वास्तविक, हिंग आणि काळे मीठ हे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीजचे खूप चांगले स्त्रोत आहेत, ज्यात ब्लोटिंग आणि ॲसिडिटीची समस्या दूर करण्याची क्षमता असते.
advertisement
5/6
शरीराला डिटॉक्सिफाय करते : हिंग आणि काळे मीठ एकत्र घेतल्याने शरीरातील विषारीपणा कमी होतो. यासाठी सर्वप्रथम 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात चिमूटभर हिंग आणि काळे मीठ टाका. आता हे पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारीपणा कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
advertisement
6/6
वजन नियंत्रित करते : आयुर्वेदाचार्यांच्या मते, शरीराचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हिंग आणि काळ्या मिठाचे सेवन करा. हिंग आणि काळे मीठ तुमचे चयापचय वाढवते, जे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. जर तुमचे वजन विनाकारण वाढत असेल तर हिंग आणि काळे मीठ खा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Black Salt Benefits : काळ्या मिठात 'हा' 1 पदार्थ टाका, बनेल औषध; या 5 आजारांवर रामबाण उपाय..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल