Summer Tips : नारळ पाणी की लिंबू पाणी... उन्हाळ्यात कोणतं ड्रिंक आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
उन्हाळ्यात दुपारी घराबाहेर पडल्यावर उन्हाच्या झळा अंगाची लाहीलाही करतात. या वातावरणात अनेकदा उष्माघाताचा देखील त्रास होतो, अशावेळी अनेकजण स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि इन्स्टंट एनर्जीसाठी नारळ पाणी किंवा लिंबू पाण्याचे सेवन करतात. तेव्हा उन्हाळ्यात कोणतं ड्रिंक आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतं याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/8

नारळ पाण्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, आयरन आणि पोटॅशियमची मात्रा भरपूर असते. नारळपाणी उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्वचा आणि केसांच्या दृष्टीने बोलायचे झाले तर नारळ पाण्याचे सेवन सर्वात चांगले ठरते. नारळ पाण्यात अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून नारळ पाणी फायदेशीर ठरते.
advertisement
2/8
लिंबू पाण्यात देखील व्हिटॅमिन सी, बी, फाइबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंटचे गुण असतात. हे शरीराला डिटॉक्स करतेच सोबतच फॅट फ्री होण्यासोबतच लठ्ठपणा देखील कमी करते. लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते, तसेच ही ड्रिंक उष्माघातापासून देखील संरक्षण करते.
advertisement
3/8
जर तुम्ही डायबेटिजचे रुग्ण असाल तर दररोज नारळ पाणी प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. नारळाच्या पाण्यात आढळणारी नैसर्गिक साखर तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
advertisement
4/8
नारळ पाण्याचे सेवन जास्त प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर जास्त नारळ पाणी पिणे टाळावे.
advertisement
5/8
दुसरीकडे जास्त प्रमाणात लिंबू पाण्याचे सेवन केल्याने हाडं कमकुवत होऊ शकतात. जर लिंबू पाणी बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर केल्यास जास्त प्रमाणात ऍसिड तयार करते, जे हाडांच्या आरोग्यासाठी वाईट मानले जाते.
advertisement
6/8
बजेटनुसार तुलना करायची झाल्यास लिंबू पाणी हे नारळ पाण्यापेक्षा स्वस्त पडते. कारण नारळ पाण्यासाठी दररोज किंमत 40 ते 60 रुपयांचा खर्च येतो तर लिंबू पाणी तुम्ही घरी बनवून देखील पियू शकता.
advertisement
7/8
लिंबू पाण्यात जास्त साखर मिसळून पिऊ नये अन्यथा रक्तातील शुगर लेव्हल वाढू शकते. हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे काळे मीठ टाकून ते पिऊ शकता, यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि तुम्हाला ॲसिडिटीपासूनही दूर राहता येईल. परंतु तुम्ही हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर मिठाचा वापर प्रमाणातच करा.
advertisement
8/8
नारळ पाणी असो वा लिंबू पाणी उन्हाळ्यात यापैकी कोणतेही ड्रिंक प्यायल्यास त्याचा शरीराला फायदाच होतो. दोन्ही ड्रिंक्समध्ये थोड्याफार प्रमाणात समानच पोषकतत्व आढळतात. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही यादोन्ही पैकी कोणत्याही ड्रिंकचे सेवन करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : नारळ पाणी की लिंबू पाणी... उन्हाळ्यात कोणतं ड्रिंक आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर?