TRENDING:

Kiwi Health Benefits: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’, चिकूसारख्या दिसणाऱ्या या फळाचे आहेत ‘इतके’ फायदे

Last Updated:
Health Benefits of kiwi in Marathi: किवी हे भारतातलं फळ जरी नसलं तरीही त्यात असलेल्या पोषकतत्वांमुळे आता ते भारतीयांच्या आहारातलं एक महत्त्वाचं फळ झालं आहे. किवी फळाचं मूळ हे चीनचं असल्यामुळे या फळाचं नाव यांग टाओ असं होतं. मात्र जेव्हा न्यूझीलंडमध्ये किवीचं उत्पादन घेतलं गेलं तेव्हा किवीचं नामकरण ‘चायनिज गुसबेरी’ असं करण्यात आलं. जाणून घेऊयात हिवाळ्यात किवी फळाचे फायदे.
advertisement
1/6
Benefits of Kiwi: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’; किवी फळाचे आहेत ‘इतके’ फायदे
किवीमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हिवाळ्यात जेव्हा हंगामी अजारांचा धोका असतो अशा वेळी किवी खाण्याने शरीर तंदुरूस्त राहायला मदत होते.
advertisement
2/6
किवीच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे संधीवात किंवा हिवाळ्यात उद्भवणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. याशिवाय किवी खाल्ल्याने कमकुवत पेशी मजबूत व्हायला मदत होते. त्यामुळे एखादी जखम भरायला वेळ लागत असेल तर किवीच्या सेवनामुळे ती जखम लवकर भरायला मदत होते.
advertisement
3/6
हिवाळ्यातलं वातावरण बदल, प्रदूषण आणि थंडीमुळे त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. मात्र किवीमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी त्वचेच्या रक्षणासाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळे त्वचेचं रक्षण तर होतंच होतं मात्र मुरूमांच्या समस्येवर देखील किवी फायदेशीर आहे.
advertisement
4/6
किवीच्या औषधी गुणधर्मांमुळे हृदय निरोगी राहायला मदत होते. किवी खाल्ल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहून हृदय विकाराचा धोका टळतो.
advertisement
5/6
किवीतले अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळे किवी फळाच्या नियमित सेवनामुळे दृष्टीदोष दूर व्हायला मदत होते.
advertisement
6/6
किवी हे फळ चवीला आंबट गोड असतं. त्यामुळे त्यात नैसर्गिकरित्या साखर जरी असली तरीही किवीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी किवी खाणं फायद्याचं ठरू शकतं. मात्र त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं किवी फळाचं सेवन करावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kiwi Health Benefits: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’, चिकूसारख्या दिसणाऱ्या या फळाचे आहेत ‘इतके’ फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल