Curd Vs Buttermilk : दही की ताक आरोग्यासाठी कोणतं जास्त चांगलं? योग्य निवडीने शरीराला होईल जास्त फायदा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Benefits of buttermilk and curd : दही आणि ताक दोन्ही भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हे दोन्ही आपल्या पोटाच्या आणि पचनाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु अनेकदा दोघांपैकी कोणते रोज खाणे चांगले आहे, याबद्दल आपल्याला स्पष्टता नसते. पण त्याचे फायदे, फरक आणि आणि गुणधर्म पाहिल्यास दोन्हींपैकी कोणती निवड योग्य हे तुम्हाला कळेल.
advertisement
1/9

दही - दही घट्ट, पौष्टिक आणि पोट भरणारे असते. दही दुधामध्ये विरजण घालून बनवले जाते, त्यामुळे ते अधिक पोषक तत्वे टिकवून ठेवते. डील खायला बऱ्याच लोकांना आवडते. उन्हाळ्यात तर हे आपल्या पोटासाठी उत्तम असते. हिवाळ्यात फक्त खाताना जरा काळजी घ्यावी.
advertisement
2/9
दह्याचे फायदे : त्यात प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे स्नायूंना फायदा होतो. दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य वाढवतात. दही जास्त वेळ पोट भरलेले ठेवते, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते उत्तम असते. कॅल्शियमने समृद्ध असल्याने ते हाडे आणि दात मजबूत करते. दही आम्लता आणि गॅस कमी करण्यास मदत करते.
advertisement
3/9
दही कधी खाणं चांगलं : दही दुपारच्या जेवणात खाणं नेहमी योग्य असतं. तुम्ही ते खिचडी, पराठे किंवा भातासोबत खाऊ शकता. ज्यांना जास्त भूक लागते त्यांच्यासाठी, मुले आणि वृद्धांसाठी दही खाणं फायदेशीर आहे.
advertisement
4/9
ताक : ताक हलके, थंड आणि पचनासाठी सर्वोत्तम असते. ताक, दही पाण्यात मिसळून बनवले जाते. तुम्ही यामध्ये चव वाढवण्यासाठी मीठ, भाजलेले जिरे आणि काळी मिरी घालू शकता.
advertisement
5/9
ताकाचे फायदे : ताक शरीराला तात्काळ थंडावा देते. म्हणून हे उन्हाळ्यात विशेष फायदेशीर असते. ताक पचन सुधारते, बद्धकोष्ठता आणि आम्लता कमी करते. ताकामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते बेस्ट आहे.
advertisement
6/9
ताकामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असल्याने ते निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन रोखते. खूप जास्त जेवणानंतर ताक प्यायल्याने पोट हलके राहण्यास मदत होते.
advertisement
7/9
ताक कधी पिणं चांगलं असतं : उन्हाळ्यात दिवसा ताक पिणं फायद्याचं असतं. तसेच तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्यांसाठी ताक उत्तम पेय आहे.
advertisement
8/9
दही आणि ताक दोन्हींपैकी कोणतं जास्त फायदेशीर : ते तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. तुम्हाला प्रथिने, पोषण आणि पोट भरणारा पर्याय हवा असेल तर दही घ्या. तुम्हाला हलके, पचायला सोपे आणि थंडगार पेय हवे असेल तर ताक प्या. दोन्हीही शरीरासाठी चांगले आहेत. फक्त योग्य वेळ आणि गरजेनुसार ते निवडा.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Curd Vs Buttermilk : दही की ताक आरोग्यासाठी कोणतं जास्त चांगलं? योग्य निवडीने शरीराला होईल जास्त फायदा