TRENDING:

Kitchen Tips : कांदा कापताना डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही! फॉलो करा 6 टिप्स

Last Updated:
कांदा कापताना बऱ्याचदा डोळ्याची जळजळ होऊन त्यातून पाणी येत. त्यामुळे अनेकजणांना कांदे कापणे हे काम खूप अवघड वाटत. पण आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांनी कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही.
advertisement
1/6
कांदा कापताना डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही! फॉलो करा 6 टिप्स
सर्वात आधी कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येत? हे जाणून घेऊयात. कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचे रसायन असते. या रसायनामुळे डोळ्यांतून पाणी येत. डोळ्यांच्या अश्रू ग्रंथींवर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.
advertisement
2/6
कांदा कापताना नेहमी वरच्या भागातून नाही तर मुळाच्या बाजूने कापावा. तसेच यावेळी धारदार सुरीचा वापर करावा. यामुळे तुमच्या डोळ्यांतून पाणी येणार नाही आणि कांदा लवकर कापला जाईल.
advertisement
3/6
कांदा कापण्यापूर्वी कांदा काही वेळ व्हिनेगरमध्ये टाकून ठेवा.असे केल्यास कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. तसेच जर कांदा कापण्यापूर्वी तुम्ही तो 2 ते 3 तास फ्रिजमध्ये ठेवल्यास कांदा कापताना त्यापासून मुक्त होणारे एन्झाइम कमी प्रमाणात बाहेर पडतील. अशा स्थितीत कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येणार नाहीत.
advertisement
4/6
प्रत्येकाच्या घरात लिंबू हा पदार्थ असतो. कांदा कापताना सुरीला लिंबूचा रस लावा, असे केल्याने डोळ्यातून पाणी येणार नाहीत. याशिवाय कांदे कापताना ब्रेडचा तुकडा तोंडात ठेवून तो चघळला असे केल्याने डोळ्यातून पाणी येणार नाही.
advertisement
5/6
ऐकायला विचित्र वाटेल परंतु कांदा कप्तान तुम्ही शिट्टी वाजवली तर डोळ्यातून पाणी येणार नाही. कारण शिट्टी वाजवताना तुमच्या तोंडातून हवा बाहेर पडते. जे कांद्यातून निघणारे एन्झाइम तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही.
advertisement
6/6
कांदा कापताना तुम्ही बाजूला मेणबत्ती किंवा दिवा लावल्यास कांद्यामधून निघणारा वायू मेणबत्ती किंवा दिव्याकडे आकर्षित होतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. कांदा हवा किंवा सूर्यप्रकाशात थोडा वेळ ठेवल्यास कांदा कापताना डोळ्यांना कमी त्रास होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : कांदा कापताना डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही! फॉलो करा 6 टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल