TRENDING:

Dark Circle Remedy : डोळ्यांखालची काळी वर्तुळं काही दिवसात होतील गायब, असे वापरा व्हिटॅमिन ई कॅप्सूल

Last Updated:
आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवर व्हिटॅमिन ई खूप फायदेशीर आहे. काहीवेळा याची कमतरता झाल्यामुळे चेहऱ्यावर आणि सर्व त्वचेवर त्याचे परिणाम दिसतात. याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे डोळ्यांखालची काळी वर्तुळं. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की डोळ्यांखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल कशा वापराव्यात.
advertisement
1/6
डोळ्यांखालची काळी वर्तुळं काही दिवसात होतील गायब, असे वापरा व्हिटॅमिन ई कॅप्सूल
व्हिटॅमिन ई त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे विशेष जीवनसत्व त्वचा ओलसर, मुलायम आणि सुंदर ठेवण्यास मदत करते. अनुभवी डॉक्टर बिस्वजित सरकार यांनी सांगितले की, अनेक लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरतात.
advertisement
2/6
हे कॅप्सूल त्वचेसाठी हानिकारक नाही. तज्ज्ञांच्या मते, या कॅप्सूलमुळे त्वचेच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते. हे कॅप्सूल त्वचेच्या काही सामान्य समस्या जसे की मुरुम, डाग, पुरळ बरे करते.
advertisement
3/6
व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे त्वचेची चमक वाढण्यासही मदत होते. मुरुम आणि पिंपल्सनंतर अनेकांच्या चेहऱ्यावर त्याचे डाग राहतात. हे स्पेशल कॅप्सूल हे डाग त्वरित कमी करते.
advertisement
4/6
यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे कॅप्सूल त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासही मदत करते. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.
advertisement
5/6
तुम्ही आंबट दही किंवा लिंबाचा रस मिसळून व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरू शकता. केसगळतीवर उपचार करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या तेलात व्हिटॅमिन ई मिसळा.
advertisement
6/6
हे सुरकुत्या, स्ट्रेच मार्क्स आणि त्वचेचे इतर डाग काढून टाकण्यास देखील मदत करते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल शरीराच्या त्वचेचे किंवा चेहऱ्याच्या त्वचेचे उन्हापासून संरक्षण करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dark Circle Remedy : डोळ्यांखालची काळी वर्तुळं काही दिवसात होतील गायब, असे वापरा व्हिटॅमिन ई कॅप्सूल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल