TRENDING:

हा माझा नवराच...! 'धुरंधर 2' मध्ये संजय दत्तला पाहताच भाळली खऱ्या चौधरी अस्लमची बायको; पण व्यक्त केली एक नाराजी

Last Updated:
Real Chaudhry Aslam Wife on Sanjay Dutt : धुरंधर 2 मध्ये संजय दत्तची चौधरी अस्लमची भूमिका पाहिल्यानंतर खऱ्या आयुष्यातील चौधरी अस्लमची बायको नौरीननने प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/7
हा माझा नवराच...! 'धुरंधर 2' मध्ये संजय दत्तला पाहताच भाळली खऱ्या चौधरी अस्लमची बायको; पण व्यक्त केली एक नाराजी
आदित्य धरचा 'धुरंधर 2' च्या कमाईसह त्यातील प्रत्येक पात्राचंही कौतुक होत आहे. फिल्ममधील काही पात्रं खऱ्या आयुष्यातील व्यक्तींसारखी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संजय दत्तचं पात्र. त्याने चौधरी अस्लमची भूमिका साकारली.
advertisement
2/7
चौधरी अस्लम हे पाकिस्तानी पोलीस अधिकारी यांच्यापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. आता संजय दत्तच्या चौधरी अस्लमच्या पात्रावर खऱ्या चौधरी अस्लमच्या बायकोची प्रतिक्रिया आहे आहे.
advertisement
3/7
चौधरी अस्लमची बायको नौरीन अस्लमने एका मुलाखतीत सांगितलं की, तिने 'धुरंधर 2' किंवा 'धुरंधर : द रिव्हेंज' फिल्म पूर्ण पाहिली नाही. तर तिला कुणीतरी फिल्मची एक छोटीशी एक क्लिप पाठवली, तीच तिने पाहिल्याचं सांगितलं.
advertisement
4/7
ती म्हणाली, "संजय दत्त खूप अपशब्द वापरतो. त्यामुळे तुम्ही फिल्म तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही. पण संजय दत्तने अपशब्द वापरले ते मला आवडले, ते त्याला शोभलं. आणि अशा शिव्या पोलीस वर्तुळात सामान्य आहेत. पण माझ्या कुटुंबासोबत ते पाहू शकत नाही"
advertisement
5/7
"मी थोडीच फिल्म पाहिली. मी फक्त तोच भाग पाहिला जिथं स्फोट होतो. जेव्हा संजय दत्त गाडीजवळ असतो आणि वर पाहतो, तेव्हा क्षणभर तो मला माझा नवरा चौधरी अस्लम असल्यासारखा वाटला. संजय दत्तचा चेहरामोहरा आणि हावभाव चौधरी अस्लम यांच्या व्यक्तिरेखेला अगदी साजेसे होतं. चौधरी अस्लमला संजय दत्त खूप आवडायचा आणि मलाही तो खूप आवडतो", असं ती म्हणाली
advertisement
6/7
पुढे नौरीनने चौधरी अस्लमचा मृत्यू कसा झाला तेसुद्धा सांगितलं आहे. ती म्हणाली, "पोलिसांना जी कामं जमली नाहीत, ती सर्व कामं अस्लमने पूर्ण केली.  2014 मध्ये एका आत्मघाती हल्ल्यात चौधरी अस्लमची हत्या झाली. 125 किलो स्फोटकांनी भरलेली एक कार त्याच्या गाडीला धडकली होती. या हत्येची जबाबदारी टीटीपीने स्वीकारली होती"
advertisement
7/7
संजय दत्तच्या पात्राचं आणि अभिनयाचं कौतुक करत असताना दुसरीकडे नुरीनने निराशाही व्यक्त केली आहे. "चित्रपटाच्या निर्मात्यांनी चौधरी अस्लम यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर अधिक संतुलितपणे सादर करण्यासाठी त्यांच्याकडून, पोलिसांकडून किंवा पत्रकारांकडून सल्ला घ्यायला हवा होता", असं ती आज तक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हा माझा नवराच...! 'धुरंधर 2' मध्ये संजय दत्तला पाहताच भाळली खऱ्या चौधरी अस्लमची बायको; पण व्यक्त केली एक नाराजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल