Facial Vs Bleaching : ब्लिच आणि फेशियलमध्ये काय फरक असतो? दोन्हींपैकी कोणतं असतं जास्त फायदेशीर?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
पार्लरमध्ये दोन ट्रीटमेंट मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. त्या म्हणजे, फेशियल आणि ब्लिच.. पण तुम्हाला या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे माहितीये का?
advertisement
1/9

त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहावी यासाठी आपण त्वचेची प्रत्येक पद्धतीनं काळजी घेत असतो. घरी स्किन केअर कारण असो की, पार्लरमध्ये त्वचेसाठी स्किन केअर ट्रीटमेंट घेणं असो. पार्लरमध्ये दोन ट्रीटमेंट मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. फेशियल आणि ब्लिच. पण तुम्हाला या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे माहितीये का? या दोन्हींपैकी आपल्या त्वचेसाठी काय जास्त फायद्याचं असू शकतं?
advertisement
2/9
चेहरा ग्लोइंग आणि ब्राईट दिसावा यासाठी या दोन्ही ट्रीटमेंट केल्या जातात. पण या दोन्हींचे परिणाम आणि फायदे वेगवेगळे आहेत. व्यक्तीच्या त्वचेवर या दोनींचा त्यांच्यावर वेगवेगळा परिणाम होतो. फेशियल आणि ब्लिचिंग या दोन्हींचा वापर वेगवेगळ्या कारंणासाठी केला जातो.
advertisement
3/9
ब्लीचिंग करण्याचा मुख्य उद्देश चेहऱ्यावरील नको असलेले केस हलके करणे आणि त्वचा त्वरित उजळ करणे हा असतो. ब्लीचिंगमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइडसारख्या रसायनांचा वापर केला जातो, जे केस ब्लीच करून त्यांना त्वचेच्या रंगाशी एकरूप करतात.
advertisement
4/9
त्याचप्रमाणे ब्लिचिंगमध्ये त्वचेवरील डागांसाठी सोडियम हायपोक्लोराइट आणि हायड्रोक्विनोन हेदेखील वापरले जाऊ शकतात. यांच्यामुळे चेहऱ्यावर इन्स्टंट चमक येते. पण याचा परिणाम मात्र काही दिवसच राहतो. तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर ब्लिचिंग केल्याने जळजळ, खाज किंवा लालसरपणा अशा त्रासांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच ब्लीचिंग करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
advertisement
5/9
फेशियल ही एक डीप स्किन केअर ट्रीटमेंट आहे. यात क्लिंझिंग, एक्सफोलिएशन, मसाज आणि मास्क यांचा समावेश असतो. फेशियलमध्ये त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. फेशियल रक्ताभिसरण वाढवते आणि मृत त्वचा काढून टाकते
advertisement
6/9
फेशियलमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. फेशियल प्रोडक्टसमध्ये जीवनसत्त्वे, औषधी वनस्पती आणि खनिजे असतात. हे आपल्या त्वचेला पोषण देतात आणि फेशियलचा परिणाम आपल्या त्वचेवर दीर्घकाळ टिकतो. यामुळे त्वचा रिलॅक्स होते.
advertisement
7/9
खरं तर ब्लीचचा वापर वारंवार करणं टाळावं. कारण त्यातील तीव्र रसायनं इन्स्टंट रिझल्ट देत असली तरी ती कालांतराने त्वचा कोरडी आणि निस्तेजदेखील बनवू शकतात. फेशियल प्रोडक्टसमध्ये मात्र सौम्य आणि त्वचेला पोषण देणारे घटक असतात. हे त्वचेला रिपेअर आणि हेल्दी बनवण्यास मदत करतात.
advertisement
8/9
तुम्हाला एखाद्या इव्हेन्टसाठी इन्स्टंट ग्लो हवा असेल तर तुम्ही ब्लीच करू शकता. मात्र हे वारंवार करू नका. शिवाय तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल किंवा किंवा चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर अशावेळीही ब्लिचिंग करू नका. दोन्हींचे वेगळे फायदे आहेत. त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट निवडू शकता.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Facial Vs Bleaching : ब्लिच आणि फेशियलमध्ये काय फरक असतो? दोन्हींपैकी कोणतं असतं जास्त फायदेशीर?