Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात आजवर कुणालाच जमलं नाही ते सागरने केलं; राखीचीही बोबडी वळली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi Sagar Rakhi : बिग बॉस मराठी 6 मध्ये सागरने असं काही केलं की राखी सावंतचीही बोलती बंद झाली नाही. आजवर ते कुणालाच जमलं नाही आणि कदाचित कुणाला जमणारही नाही.
advertisement
1/7

बिग बॉस आणि राखी म्हणजे एक समीकरणच आहे. राखीने बिग बॉस हिंदी आणि मराठी दोन्ही गाजवली आहे. बहुतेक सीझन्समध्ये ती दिसली आहे. बिग बॉस सुरू झालं की राखी सावंतही हवी अशी अपेक्षा प्रेक्षकांची असते. राखी म्हणजे बिग बॉसच्या घरात चांगलाच ड्रामा पाहायला मिळतो.
advertisement
2/7
राखीशी पंगा घेणं म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखंच असतं. राखी भांडायला लागली की ती कुणाचंच ऐकत नाही. सतत तिची बडबड बडबड. पण आता बिग बॉसच्या घरात सागरने असं काही केलं की क्षणभर का होईना राखीची बोलती बंद झाली.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सागर कारांडे आजवर ट्रोल झाला आहे. पण आता पहिल्यांदाच सागरने असं काही केलं आहे की त्यामुळे राखीची बोलती बंद झाली आहे. आजवर कुणालाच जमलं नाही ते सागरने केलं असं म्हणायला हरकत नाही. आता असं नेमकं सागरने केलं तरी काय? की राखीसारख्या स्पर्धकाचीही बोबडी वळली आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
4/7
तर सागर राखीला काही डायलॉग बोलून दाखवतो आणि राखीलाही ते बोलायला सांगतो. आधी सागर आणि नंतर राखी असं डायलॉग बोलणं सुरू असतं. सागर अगदी शुद्ध मराठीत डायलॉग बोलतो म्हणजे जे आपल्या दररोजच्या बोलण्यात फार नसतात किंवा बोलताना आपली जीभ अडखळते.
advertisement
5/7
सुरुवातीला तो छोटे छोटे डायलॉग बोलतो जे राखी बोलते. पण शेवटी मात्र तो असा एकच लांबलचक डायलॉग बोलतो की राखीला काहीच समजत नाही. ती क्षणभर गप्प बसते, तिच्या चेहऱ्याचा रंग उडतो.
advertisement
6/7
पण शेवटी राखी ती राखीच हार कशी मानले. 4 दिवसाचं एकाच वेळी बोलले असं ती सागरला सांगते. शेवटी ती म्हणते, "मी हे मनात बोलले, तोंडातून बाहेर येत नाहीये"
advertisement
7/7
सागर आणि राखी यांच्यातील हा मजेशीर असा व्हिडीओ आहे. राखीची बोलती बंद करणं तसं सोपं नाही आजवर कोणत्या सीझनमध्ये कुणालाच ते जमलं नसेल. पण एका वाक्याने हा होईना सागरने मात्र ते करून दाखवलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात आजवर कुणालाच जमलं नाही ते सागरने केलं; राखीचीही बोबडी वळली