TRENDING:

Dussehra 2024: दसऱ्याला झेंडूचीच फुलं का वापरतात? हिंदू धर्मात त्यांचं महत्त्व काय?

Last Updated:
तुम्ही कधी हा विचार केला आहे का की दसऱ्याला किंवा इतर हिंदू सणांमध्ये कोणतीही पूजा करताना झेंडूचीच फुलं वापरली जातात.
advertisement
1/9
दसऱ्याला झेंडूचीच फुलं का वापरतात? हिंदू धर्मात त्यांचं महत्त्व काय?
Dasra 2024: हिंदू धर्मात दसरा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दसरा. दसऱ्याला विजयाचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अतिशय उत्साहात हा सण साजरा केला जातो.
advertisement
2/9
दसऱ्याला प्रत्येक घराघरांमध्ये सुंदर सजावट केली जाते. ही सजावट करताना आवर्जून झेंडूची फुलं वापरली जातात. यावेळी झेंडूच्या फुलांची तोरणे, माळा तयार करून त्यांनी घर सजवले जाते. इतकंच नाही तर या दिवशी आपल्या घरातील गाड्या, मशिन यांची पूजा करून त्यांनाही याच माळांनी सजवले जाते.
advertisement
3/9
मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का की दसऱ्याला किंवा इतर हिंदू सणांमध्ये कोणतीही पूजा करताना झेंडूचीच फुलं वापरली जातात. दसरा या सणात डूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचाच वापर होतो.
advertisement
4/9
झेंडूच्या फुलांना दसऱ्याच्या दिवशी इतकं महत्त्व का आहे? हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी या फुलांचा का वापर केला जातो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
advertisement
5/9
दसरा हा सण साजरा करताना झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. खरं तर यामागील कारण म्हणजे झेंडूची फुलं अगदी सहज उपलब्ध असतात. त्यांच्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे ही फुलं खास आहेत. या रंगामुळे ते सोनेरी असल्याचे जाणवतं
advertisement
6/9
हिंदू धर्मात पिवळा, केशरी किंवा सोनेरी रंग शुभ मानले जातात. झेंडूच्या फुलांचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे झेंडूच्या फुलांचं धार्मिक महत्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे. म्हणून विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुलं वापरण्याचं महत्त्व आहे.
advertisement
7/9
या फुलाला हिरण्यगर्भ पुष्प देखील म्हणतात. त्वचेवर एखादी जखम झाल्यास किंवा त्वचारोग झाल्यास या फुलांचा रस लावल्यास जखम लवकर सुधारते. तसेच असे म्हटले जाते की या फुलांच्या सेवनाने तोंडाचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते.
advertisement
8/9
मूत्रविकारात देखील झेंडूच्या औषधी गुणधर्मांचा फायदा होतो. दमा, श्वसनाच्या आजारांवर देखील झेंडू उपयुक्त आहे. सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक असलेल्या झेंडू या फुलाला इंग्रजीमध्ये मेरीगोल्ड म्हटलं जातं. हे फुलं सूर्याचे प्रतीक असतात.
advertisement
9/9
प्राचीन ग्रंथात असलेल्या नोंदीनुसार हे फुल सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. याला संस्कृतमध्ये स्थूल पुष्प या नावाने ओळखतात. तसेच या फुलाला सत्याचे प्रतीक देखील मानलं जातं. त्याचबरोबर, पिवळा रंग देवाप्रती समर्पणाचे प्रतीक आहे. याच्या सुंगधाने नकारात्मक शक्ती दूर होऊन ताण कमी होण्यास मदत होते. हे वातावरणाला शांती प्रदान करणारे फुल आहे, असं गुरुजीं नचिकेत कोजरेकर यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dussehra 2024: दसऱ्याला झेंडूचीच फुलं का वापरतात? हिंदू धर्मात त्यांचं महत्त्व काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल