Desi Ghee Benefits: सर्दी, खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यतच्या आजारांवर गुणकारी आहे साजूक तूप, साजूक तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती आहे?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Desi Ghee Benefits of in Marathi: गाईच्या किंवा म्हशीच्या दुधावर येणाऱ्या सायीला कढवून तयार होणारा पदार्थ म्हणजे साजूक तूप. पारंपारिक भारतीय पद्धतीने बनवलेल्या तुपाला धर्मशास्त्रातही पवित्र मानलं गेलं आहे. तुपात अनेक जीवनसत्त्वं, पोषततत्वं आहेत. त्यामुळे नियमितपणे तूप खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. मात्र ज्यांना तूप खाणं आवडत नाही, त्यांनी हिवाळ्यात औषध म्हणून तुपाचा वापर करावा. जेणेकरून आजारी पडण्याची वेळ येणार नाही आणि विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. जाणून घेऊयात हिवाळ्यात तूप खाण्याचे फायदे, योग्य वेळ आणि योग्य पद्धत.
advertisement
1/9

तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडही असतात. यामुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्स पासून रक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हिवाळ्यात साथीच्या विकारांपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी जेवणात तुपाचा समावेश केल्याने चांगले फायदे होतात.
advertisement
2/9
तुपात असलेल्या फॅट्स, फॅटी ॲसिड आणि अन्य पोषकतत्त्वांमुळे तूप हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर ठरतं. तुपाच्या सेवनाने त्वचा मऊ आणि हायड्रेट राहायला मदत होते. रात्री झोपताना हलक्या तुपाने मसाज करून झोपल्याने त्वचेची झीजही भरून निघते. सकाळी कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेट राहायला मदत होते
advertisement
3/9
तुपात असलेलं व्हिटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. यामुळे दृष्टीदोष कमी व्हायला मदत होते. शिवाय तुपामुळे त्वचेचं आरोग्य सुधारल्याने डोळ्याभोवती सुरकुत्या आणि काळी वर्तुळं येत नाही.
advertisement
4/9
दररोज योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तुपात असलेली विविध पोषकतत्त्वं अन्न पचायला मदत करतात. त्यामुळे आतड्यांवर ताण येत नाही आणि आतड्यांच्या आरोग्यातही सुधारणा होते.
advertisement
5/9
रात्रीच्या जेवणात 1 चमचा तूप खाल्ल्यास जळजळीचा त्रास कमी होतो. याशिवाय तुपामुळे जेवण पचायला मदत होत असल्याने रात्रीच्या जेवणानंतर शांत झोप येऊ शकते. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास असलेल्यांनी तूप खाणं फायद्याचं ठरतं.
advertisement
6/9
तुपात असलेले व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि फॅटी ॲसिड हे केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. या पोषकतत्त्वांमुळे केसांची मुळं मजबूत व्हायला मदत होऊन केस गळतीच्या समस्यांपासून सुटका होते.
advertisement
7/9
तुपात मोनोअनसॅच्युरेटेड ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. यामुळे रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयाचं आरोग्य सुधारतं.
advertisement
8/9
तुपामध्ये लिनोलिक ॲसिड असतं. यामुळे चयापचय क्रिया वाढून अन्न पचायला मदत होते. याशिवाय शरीरारत जमलेली अतिरिक्त चरबी जाळूण टाकण्यातही लिनोलिक ॲसिड मदत करतं. यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात थोडं साजूक तूप टाकून ते पाणी प्यायल्यास फायदा होतो.
advertisement
9/9
विविध प्रकारच्या सांधेदुखीवर साजूक तूप हे फायद्याचं मानलं जातं. तुपातल्या औषधी गुणधर्मांमुळे ते एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. मात्र तूप शरीरातल्या हे सांध्यांमध्ये वंगण म्हणूनही काम करतं. तुपाच्या सेवानामुळे हाडांचं आयुष्य सुधारून संधिवाताचा त्रास दूर होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Desi Ghee Benefits: सर्दी, खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यतच्या आजारांवर गुणकारी आहे साजूक तूप, साजूक तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती आहे?