Home decoration ideas: तुमच्या घराला द्या शाही रूप! कमी खर्चात करा आकर्षक सजावट, पाहा सोप्या टिप्स!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
दिवाळीच्या निमित्ताने तुमचे घर एखाद्या राजवाड्यासारखे सुंदर दिसण्यासाठी काही सोप्या सजावटीच्या टिप्स पाळा, ज्यामुळे जास्त मेहनत किंवा खर्च लागणार नाही. तुम्ही...
advertisement
1/6

सणासुदीच्या दिवसांमध्ये घर सजवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असे केल्याने तुमचे संपूर्ण घर एखाद्या महालासारखे सुंदर दिसेल. तसेच तुम्हाला जास्त मेहनत आणि खर्चही करावा लागणार नाही.
advertisement
2/6
सणांच्या काळात तुम्ही रंगीत लाईट आणि फुलांनी आपले घर सजवू शकता. तुम्हाला हवे असल्यास झेंडू आणि गुलाबच्या फुलांनी लिविंग रूम सजवू शकता.
advertisement
3/6
घराच्या सजावटीसाठी तुम्ही रंगीत पेपरचा वापर करू शकता. हे पेपर लॅम्प तुम्ही बाजारातून विकत आणू शकता. पेपर लॅम्पला एखाद्या लाईटवर ठेवल्याने घराला अप्रतिम लुक मिळेल आणि ये-जा करणारे पाहतच राहतील.
advertisement
4/6
रांगोळीमुळे घराच्या सौंदर्यात भर पडते. सजावटीसाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. या दिवाळीतही तुम्ही घराच्या भिंतींवर किंवा जमिनीवर सुंदर रांगोळी काढू शकता.
advertisement
5/6
घराच्या सजावटीसाठी तुम्ही काचेच्या बाउललाही सजवू शकता. यासाठी तुम्ही काचेच्या बाउलमध्ये पाणी टाका. आता गुलाब आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकून फ्लोटिंग कॅन्डल लावू शकता.
advertisement
6/6
सणांमध्ये खासकरून दिवाळीत प्रत्येक घरात दिवे लावले जातात. दिवाळीत तुम्ही घर सजवण्यासाठी साध्या दिव्यांना रंगवू शकता. हे सर्व करून तुम्ही या दिवाळीत तुमच्या घराला सुंदर लुक देऊ शकाल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Home decoration ideas: तुमच्या घराला द्या शाही रूप! कमी खर्चात करा आकर्षक सजावट, पाहा सोप्या टिप्स!