TRENDING:

Tea Poha : चहासोबत पोहे का खाऊ नये, चहा-पोहे खाल्ल्याने काय होतो परिणाम?

Last Updated:
Tea And Poha : चहा आणि पोहे खाणारे खूप लोक आहेत. त्यामुळे चहा-पोहे एकत्र खाऊ नका, असं सांगितल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. यामागील कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
1/5
Tea Poha : चहासोबत पोहे का खाऊ नये, चहा-पोहे खाल्ल्याने काय होतो परिणाम?
कांदेपोहे हा कित्येकांच्या घरातील कॉमन ब्रेकफास्ट आहे. कांदेपोहे म्हटलं की सोबत चहा आलाच. चहाप्रेमींना तर कांदेपोह्यांसोबत चहा लागतोच. काही लोक साधे पोहेही चहासोबत खातात. पोहे आणि चहा हे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत असलं तरी ते तुमच्या शरीरासाठी मात्र चांगलं नाही.
advertisement
2/5
चहा आणि पोहे एकत्र खाऊ नका, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. आता चहा आणि पोहे खाण्यात काय समस्या आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यामागील कारणही त्यांनी दिलं आहे.
advertisement
3/5
आहारतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार पोह्यांमधून आपल्या शरीराला लोह मिळतं. पण चहामध्ये टॅनिन असतं. जेव्हा पोहे चहासोबत खाल्ले जातात तेव्हा चहातील टॅनिनमुळे लोह शरीरात शोषलं जात नाही.
advertisement
4/5
पोहेच नाही तर जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधीही चहा पिऊ नका, कारण यामुळे अन्नपदार्थातील पोषक घटक शरीरात शोषले जात नाहीत.
advertisement
5/5
यांनी @NutraLifesmk या युट्युब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. चहासोबत पोहे खाऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea Poha : चहासोबत पोहे का खाऊ नये, चहा-पोहे खाल्ल्याने काय होतो परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल