तुम्हालाही दुपारी जेवल्यानंतर झोप येते? यामागे आहेत खास वैज्ञानिक कारणं, वाचा सविस्तर
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
जेवल्यानंतर झोप येणं ही आजाराची लक्षणं नसून शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पचनासाठी रक्तप्रवाह वाढतो, आणि मेंदूतील सक्रियता कमी होते. जेवणात असलेल्या...
advertisement
1/6

दुपारच्या जेवणानंतर अनेकांना झोप येते, खासकरून पोटभर जेवल्यावर. ही समस्या अनेकांना सतावते आणि कधीकधी तर ऑफिसमध्येही यामुळे लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण जेवणानंतरच झोप का येते? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया...
advertisement
2/6
जेवणानंतर येणाऱ्या या झोपेला वैज्ञानिक भाषेत 'पोस्ट-प्रांडियल सोम्नोलेन्स' असं म्हणतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा काही आजार नाही, तर आपल्या शरीराच्या नैसर्गिक जैविक प्रक्रियेचाच एक भाग आहे. काही गोष्टींमुळे ही झोप आणखी वाढते.
advertisement
3/6
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, जेवणानंतर बहुतेक लोकांना जास्त झोप आणि आळस जाणवतो. ज्यांची पचनक्रिया चांगली नाही किंवा ज्यांच्या झोपण्याच्या सवयी बिघडलेल्या आहेत, त्यांना जेवणानंतर झोप येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय, जेव्हा आपण जेवतो, तेव्हा पचनसंस्थेकडे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि मेंदूकडे कमी होतो. यामुळे आपल्याला सुस्ती किंवा झोप येते.
advertisement
4/6
जेवण पचनसंस्थेत पोहोचताच त्याचे ऊर्जेमध्ये, म्हणजेच ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेत अनेक हार्मोन्स बाहेर पडतात, जे मेंदूला झोप येण्याचा किंवा झोप लागण्याचा संकेत देतात. जर तुम्ही प्रथिने (प्रोटीन) आणि कर्बोदके (कार्ब्स) असलेले पदार्थ जास्त खाल्ले, तर शरीरातील 'सेरोटोनिन' नावाचे झोपेचे हार्मोन वाढते, ज्यामुळे तुम्हाला झोप किंवा आळस येतो.
advertisement
5/6
दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आहारात कर्बोदकांचं प्रमाण जास्त असणं. जेव्हा आपण दुपारच्या जेवणात भात, ब्रेड, बटाटे किंवा गोड पदार्थ यांसारखे भरपूर कर्बोदके खातो, तेव्हा शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. इन्सुलिन मेंदूला काही अमीनो ॲसिड, विशेषतः ट्रिप्टोफॅन, पाठवण्यास मदत करते. ट्रिप्टोफॅनपासून र्होटोनिन आणि मेलाटोनिन तयार होतात आणि हे न्यूरोट्रान्समीटर्स झोप आणतात. म्हणूनच, जर तुमच्या आहारात कर्बोदकांचं प्रमाण जास्त असेल, तर तुम्हाला झोप येऊ शकते.
advertisement
6/6
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, नेहमी संतुलित दुपारचं जेवण घ्या. एकाच वेळी खूप जास्त खाण्याऐवजी, थोडं थोडं करून अनेक वेळा खा. जेवणानंतर थोडं चालायला गेल्यानेही झोप आणि आळस कमी होण्यास मदत होते. ही अगदी सोपी गोष्ट आहे, पण त्याचा फायदा खूप मोठा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुम्हालाही दुपारी जेवल्यानंतर झोप येते? यामागे आहेत खास वैज्ञानिक कारणं, वाचा सविस्तर