बेस्ट स्ट्रीट फूडचा घ्यायचाय आस्वाद? मुंबईतील 'या' 7 ठिकाणी द्या भेट PHOTOS
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
स्ट्रीट फूड हे प्रत्येक शहरामध्ये प्रामुख्याने ख्यायला मिळते. तुम्हाला ही मुंबईत स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायचा असेलतर या 7 आऊटलेट्सला भेट देवू शकता.
advertisement
1/8

प्रत्येकजण स्ट्रीट फूडचा शौकीन असतो. स्ट्रीट फूड हे प्रत्येक शहरामध्ये प्रामुख्याने ख्यायला मिळते. तुम्हाला ही मुंबईत स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायचा असेलतर या 7 आऊटलेट्सला भेट देवू शकता.
advertisement
2/8
भुट्टा आणि बुर्राटा : गुजरात मधील घरामध्ये केला जाणारा हा पदार्थ प्रसिद्ध आहे. पेरी रोड वरील वांद्रे येथील बॉम्बे स्वीट शॉपच्या आऊटलेटमध्ये तुम्हाला भुट्टा आणि बुर्राटा ख्यायला मिळेल. पावसाळ्यात तुम्ही या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेऊ शकता. याची किंमत 400 रुपये आहे.
advertisement
3/8
ट्रिपल शेजवान राईस : ऑल क्रीम सेंटर आऊटलेट या ठिकाणी तुम्ही ट्रिपल शेजवान राईस घाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला मुघलाई दम बिर्याणी आणि हैदराबादी बिर्याणीसारखी चव मिळेल. याची किंमत 495 रुपये आहे.
advertisement
4/8
मसालेदार बटाटा असलेली पाणीपुरी : पाणीपुरी ख्यायला सर्वांनाच आवडते. प्लॉट बी 12, घनश्याम चेंबर, लोखंडवाला, अंधेरी पश्चिम इथे तुम्ही मसालेदार बटाटा असलेली पाणीपुरी खावू शकतात. कलामाता ऑलिव्ह पण तुम्हाला या सोबत ख्यायला मिळेल. याची किंमत 355 रुपये आहे.
advertisement
5/8
नायट्रो भेळ: स्पाइसक्लब, लोअर परळ इथे नायट्रो भेळचा खावू शकता. भेळ तुमच्या टेबलावर बनवली जाते आणि सर्व चटण्या आणि टॉपिंग्स बरोबर दिली जाते. या भेळची 575 रुपये रुपये आहे.
advertisement
6/8
बॉम्बे बॉम्ब: भैरव सिंग बॉम्बे बॉम्ब हे फूड गिरगावच्या चौपाटी समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी विकतात. तळलेल्या बटाट्याच्या यामध्ये समावेश असतो. मसालेदार चटणी भरून हरभऱ्याच्या पिठात तळले जाते. याची किंमत 350 रुपये आहे. कोचीन स्ट्रीट, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट इथे पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
advertisement
7/8
पावसाळा हाय-चाय : प्रीतम दा ढाबा, स्वामी गंजीवदास मार्ग, दादर पूर्व या ठिकाणी तुम्ही सँडविच आणि पकोड्या सोबत या चहाचा आस्वाद घेऊ शकता. याची किंमत 295 रुपये आहे.
advertisement
8/8
पावभाजी कोन: 145 कॅफे आणि बार, टेम्पल बार बिल्डिंग, पहिला मजला, महात्मा गांधी रोड, काळा घोडा बाजार या ठिकाणी तुम्ही पावभाजी कोनचा आस्वाद घेवू शकतात. पावभाजी कोनची 275 रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
बेस्ट स्ट्रीट फूडचा घ्यायचाय आस्वाद? मुंबईतील 'या' 7 ठिकाणी द्या भेट PHOTOS