दुधासोबत खा 4 पदार्थ; हाडं होतील भक्कम, पोट होईल साफ, झोप लागेल शांत!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अनेक घरांमध्ये दररोज दुधाचा वापर होतो. तुम्हालासुद्धा दुधाचे फायदे माहित असतीलच. दुधात कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड असतं, ज्यामुळे हाडं भक्कम होतात आणि शरीर तंदुरुस्त राहतं. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
1/5

दुधासोबत आंबा खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आंब्यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. 'डायट टू नरिश'च्या को फाउंडर प्रियंका जयस्वाल यांनी ही माहिती दिलीये.
advertisement
2/5
प्रियंका यांनी सांगितलं की, दूध आणि खरबुजाचं कॉम्बिनेशनही खूप हेल्थी आहे. काहीजण दूध आणि खरबुजाची स्मूदी किंवा शेक बनवून पितात. खरबुजात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते.
advertisement
3/5
दुधासोबत ड्रायफ्रूट्स खाणंही आरोग्यदायी आहे. यामुळे हृदय सुदृढ आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. शिवाय बद्धकोष्ठताही. तसंच ड्रायफ्रूट्समुळे स्मरणशक्ती उत्तम राहते.
advertisement
4/5
दुधासोबत मध खाणंही <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/reverse-walking-can-help-you-reduce-weight-mhij-1187085.html">फायदेशीर</a> आहे. हे दोन्ही पदार्थ पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. दुधात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, प्रोटीन आणि मिनरल्स भरपूर असतात, तर मधात अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफँगल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, पचनसंस्था आणि हाडं मजबूत होतात, तर घसाही साफ होतो आणि झोप चांगली लागते.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली तरी आपण कोणत्याही <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/vegetarian-dish-that-taste-better-than-meat-is-also-good-for-diabetes-mhij-1187245.html">पदार्थाचं सेवन</a> करण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/drinking-cold-water-can-be-harmful-for-heart-health-mhij-1187125.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्या. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
दुधासोबत खा 4 पदार्थ; हाडं होतील भक्कम, पोट होईल साफ, झोप लागेल शांत!