लिंबापेक्षा आंबट पण झणझणीत! इथं लाल मुंग्यांची करतात चटणी, लोक खातात आवडीनं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Red Ant Chutney: घरात लाल मुंगी दिसली की, तुम्ही काय करता? तिला पळवून लावता आणि आणखी मुंग्या येऊ नये यासाठी उपाय करता, बरोबर ना? अनेकजण मुंगी दिसली की तिला जागच्या जागी चिरडून टाकतात. परंतु याच मुंगीची चटणी बनवून खाल्ली तर? आपण असा विचारही करू शकत नाही, परंतु काहीजण खरोखर चक्क मुंग्यांची चटणी बनवून खातात, तेही अगदी चवीने. (शिखा श्रेया, प्रतिनिधी / रांची)
advertisement
1/5

झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथील रहिवासी शालिनी सांगतात की, इथल्या काही समुदायांमध्ये लाल मुंग्यांची चटणी अत्यंत लोकप्रिय आहे. काहीजण ही चटणी घरीच बनवतात, तर काहीजण बाजारातून विकत आणतात. शिवाय खास चटणीसाठी बाजारात जिवंत लाल मुंग्याही मिळतात.
advertisement
2/5
चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मुंग्या गोळ्या करून त्यांना कडकडीत गरम पाण्यात उकळायचं. त्यामुळे त्या स्वच्छ होतात. मग मुंग्यांना व्यवस्थित धुवून आलं, लसूण, मिरची, कांदा आणि टोमॅटोसोबत बारीक वाटायचं.
advertisement
3/5
हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक केलं तर चटणीला हवी तशी चव येत नाही. त्यामुळे ते स्वतः दगडावरच वाटायचं, असं शालिनी यांनी सांगितलं. तर, वाटणात सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आणि थोडं मोहरीचं तेल घालावं.
advertisement
4/5
अशाप्रकारे मुंग्यांची चटणी तयार होईल. आंबट-तिखट अशा चवीची ही चटणी अतिशय स्वादिष्ट लागते असं शालिनी सांगतात. विशेषतः हिवाळ्यामध्ये आहारात तिचा प्रामुख्याने समावेश असतो. कारण या चटणीमुळे शरिरात उब निर्माण होते, शिवाय साथीच्या आजारांवर आराम मिळतो. इथले लोक वर्षानुवर्षे ही चटणी खातात.
advertisement
5/5
शालिनी यांनी सांगितलं की, ही चटणी बनवताना एकच काळजी घ्यावी, ती म्हणजे मुंग्या व्यवस्थित धुवायच्या, नाहीतर त्यातली घाण पोटात गेल्यास ती आरोग्यासाठी विष ठरू शकते. शिवाय वाटण्याआधी मुंग्या तेलात फ्राय करून घेतल्या तरी चालतं, असं शालिनी म्हणाल्या. दरम्यान, ही सर्वसामान्य माहिती आहे. त्यामुळे आपण कोणताही नवा पदार्थ खाण्यापूर्वी स्वत: तज्ज्ञांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
लिंबापेक्षा आंबट पण झणझणीत! इथं लाल मुंग्यांची करतात चटणी, लोक खातात आवडीनं