TRENDING:

पावसाळ्यात अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे, कसं आणि कधी खावं? पूर्ण माहिती

Last Updated:
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, इत्यादी साथीचे आजार झपाट्यानं पसरतात. त्यामुळे या काळात आरोग्य खूप जपावं लागतं. भरपूर पौष्टिक तत्त्व मिळतील असा आहार घेणं आवश्यक असतं. अशाच एका पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण फळाबाबत माहिती जाणून घेऊया. (आकाश कुमार, प्रतिनिधी / जमशेदपूर)
advertisement
1/5
पावसाळ्यात अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे, कसं आणि कधी खावं? पूर्ण माहिती
आयुर्वेदिक डॉक्टर अनिल राय सांगतात की, अंजीर हे फळ आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. पावसाळ्यात ते आणखी उपयुक्त ठरतं. अंजीरमध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि महत्त्वाचे व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. या फळांमुळे शरीर ऊर्जावान राहतं. रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते.
advertisement
2/5
अंजीर खाल्ल्यानं शरिरात उब निर्माण होते, म्हणूनच थंड वातावरणात फोफावणाऱ्या साथीच्या आजारांपासून शरिराचं रक्षण होतं. तसंच अंजीरमध्ये भरपूर फायबर असल्यानं पचनसंस्था उत्तम राहते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
advertisement
3/5
डॉक्टरांनी सांगितलं की, अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे फळ त्वचेसाठीसुद्धा <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/home-remedies-for-headaches-and-digestive-disorders-mhij-1226714.html">फायदेशीर</a> ठरतं. यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो आणि नैसर्गिक तेज येतं.
advertisement
4/5
अंजीरमध्ये असलेल्या ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड्समुळे कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम राहते. ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. आपण दररोज नाश्त्यात किंवा रात्री झोपण्यापूर्वी अंजीर खाऊ शकता. गरम पाण्यात भिजवून खाल्ल्यानंही अंजीर <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/lose-your-weight-fast-with-weight-loss-fasting-mhij-1226781.html">आरोग्यासाठी फायदेशीर</a> ठरतं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/you-will-never-throw-away-lemon-peels-after-reading-this-mhij-1226830.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पावसाळ्यात अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे, कसं आणि कधी खावं? पूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल