डाळीमध्ये हिंग का घालतात? फक्त सुगंधासाठी नाही, यामागे लपलंय वैज्ञानिक कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांच्या घरात विशिष्ट ठिकाणावरुन मसाले विकत घेतले जातात. जिथे काही लोक पिढ्यानपिढ्या मसाले बनवतात. अशाच मसाल्यांपैकी एक म्हणजे हींग.
advertisement
1/10

भारतीय स्वयंपाकाची ओळख जर एका शब्दात करून द्यायची असेल, तर तो शब्द “चव” असाच असेल आणि ही चव वाढवण्यासाठी महत्वाचे असतात ते मसाले, त्या सिक्रेट मसाल्यामुळेच ती विशिष्ट गोष्ट चविष्ट लागते. अनेकांच्या घरात विशिष्ट ठिकाणावरुन मसाले विकत घेतले जातात. जिथे काही लोक पिढ्यानपिढ्या मसाले बनवतात. अशाच मसाल्यांपैकी एक म्हणजे हिंग.
advertisement
2/10
डाळ असोत किंवा खाद्या पदार्थाला फोडणी द्यायची असोत, त्यात सर्वात आधी आवर्जून टाकला जाणारा पदार्थ आहे हिंग. चिमुटभर हिंग डाळीचा संपूर्ण स्वाद बदलून टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या डाळ किंवा भाजीत हिंग घालण्यामागे फक्त चव नाही तर एक वैज्ञानिक कारणही दडलेलं आहे?
advertisement
3/10
हिंग म्हणजे नेमकं काय?भारतात मिळणारे हिंग प्रत्यक्षात इराण, अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसारख्या शुष्क प्रदेशांत आढळणाऱ्या Ferula या वनस्पतीपासून मिळते. या झाडाच्या जाड मुळांवर चीरा मारला की त्यातून दूधासारखा पांढरा चिकट रस बाहेर येतो. काही आठवड्यांत हा रस वाळून जाड, खडबडीत, तपकिरी किंवा लालसर तुकड्यांच्या रूपात बदलतो. हाच अस्सल, नैसर्गिक हिंग असतो.
advertisement
4/10
डाळमध्ये हिंग का घालतात? यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊ
advertisement
5/10
आपण रोज वापरणाऱ्या डाळमध्ये तूरडाळ, मूग, उडद, चणाडाळ वापरतो, या सर्वांच्या सेल वॉलमध्ये सेल्यूलोज, हेमीसेल्यूलोज आणि पेक्टिन असते. यामधील सेल्यूलोज हा गुंतागुंतीचा कार्बोहायड्रेट आहे. माणसाच्या पचनसंस्थेत Cellulase नावाचा एन्झाइम नसल्यामुळे हा घटक पूर्ण तुटत नाही. त्यामुळे डाळचा काही भाग तसाच आतड्यांपर्यंत पोहोचतो आणि तिथे जाऊन बॅक्टेरिया त्याचं फर्मेंटेशन करतात.
advertisement
6/10
या प्रक्रियेमुळे काय होतं?यामुळे पोटात गॅस तयार होतो, तसेच पोट फुलतं, भारीपणा येतो, यामुळे कधी कधी कळासुद्धा येऊ शकतात. अशावेळी हिंग कामी येतं.
advertisement
7/10
हिंग कसं काम करतं?हिंग मध्ये वाष्पशील सल्फर कंपाउंड्स असतात. हे कंपाउंड्स आतड्यांमध्ये होणाऱ्या जास्त फर्मेंटेशनला कमी करतात. त्याचबरोबर हिंगमधील Antispasmodic गुणधर्म आतड्यांतील स्नायूंना रिलॅक्स करतात. त्यामुळे गॅस कमी तयार होतो, पोट फुलत नाही, क्रॅम्प्स कमी होतात, डाळ खाल्ल्यानंतर हलकं, आरामदायक वाटतं
advertisement
8/10
पण लक्षात ठेवा, हींग सेल्यूलोज थेट तोडत नाही, पण डालमधील जटिल ओलिगोसॅकरीड्समुळे होणारं फर्मेंटेशन कमी करून अप्रत्यक्षपणे आराम देते.
advertisement
9/10
हिंग कसं वापरावं?तडका करताना 1–2 चिमूट हिंग गरम तेलात घाला. मग जीरा, मोहरी टाका, यासोबत हिंगाचा स्वाद आणखी छान होतो आणि डाळीला चव देखील येते. शक्य असल्यास हिंगाचा खडा वापरा कारण बाजारात मिळणारे काही पावडर प्रकार मिलावटी असू शकतात.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
डाळीमध्ये हिंग का घालतात? फक्त सुगंधासाठी नाही, यामागे लपलंय वैज्ञानिक कारण