TRENDING:

जेवणासोबत तोंडी लावायला लोणचं हवंच! गाजराच्या लोणच्याची चटपटीत रेसिपी अशी बनवा

Last Updated:
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या मार्केटमध्ये येतात. फळभाज्या आणि पालेभाज्या पौष्टीक असल्याने वेगवेगळी पद्धत वापरून नवनवीन पदार्थ बनवल्या जाते. तुम्ही झटपट असे गाजराचे लोणचे सुद्धा बनवू शकता.
advertisement
1/7
जेवणासोबत तोंडी लावायला लोणचं हवंच! गाजराच्या लोणच्याची चटपटीत रेसिपी अशी बनवा
जेवण करताना नेहमी त्यासोबत काही तरी चटपटीत पाहिजे असतं. आंबा आणि लिंबूचे लोणचे तर आपल्याकडे असतेच. पण, हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या मार्केटमध्ये येतात.
advertisement
2/7
फळभाज्या आणि पालेभाज्या पौष्टीक असल्याने वेगवेगळी पद्धत वापरून नवनवीन पदार्थ बनवल्या जाते. तुम्ही झटपट असे गाजराचे लोणचे सुद्धा बनवू शकता. अगदी कमी वेळात चटपटीत असे गाजराचे लोणचे तुम्ही तयार करू शकता. गाजराचे लोणचे ही रेसिपी अमरावती मधील वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे.
advertisement
3/7
गाजराचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य : बारीक काप केलेले गाजर, जिरे, मोहरी, बडीशेप, मोहरीची डाळ, तेल, लाल तिखट, हळद, मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
4/7
सर्वात आधी गाजर सोलून त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर गूळ बारीक करून घ्यायचा. त्यानंतर गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल टाकायचे. तेल थोडे गरम झाले की, त्यात जिरे आणि मोहरीची डाळ टाकायची. त्यानंतर लगेच गाजर टाकायचे. ते व्यवस्थित मिक्स करायचं.
advertisement
5/7
त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, मीठ, बडीशेप टाकायची आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यांनतर चवीनुसार लिंबाचा रस टाकायचा. तुम्हाला जेवढे चटपटीत लोणचे हवे असेल तेवढं तुम्ही लिंबाचा रस जास्त टाकू शकता.
advertisement
6/7
त्यांनतर बारीक केलेला गूळ टाकायचा. गूळ सुद्धा छान मिक्स करून त्यावर 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. गूळ आणि लिंबाचा रस यामुळे लोणचे अधिक टेस्टी होण्यास मदत होते. 5 मिनिटानंतर तुम्ही बघाल तर लोणचे तयार झालेले असेल.
advertisement
7/7
गुळाचा छान पाक सुटलेला असेल. अतिशय चटपटीत असे गाजराचे लोणचे अगदी कमीत कमी वेळात तयार होते. हे लोणचे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकता. दररोजच्या जेवणात तुम्ही हे लोणचे आवडीने खाऊ शकता, असे वृषाली यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
जेवणासोबत तोंडी लावायला लोणचं हवंच! गाजराच्या लोणच्याची चटपटीत रेसिपी अशी बनवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल