Kasuri Methi : सुगंधी कसुरी मेथी घरीच कशी बनवायची? फक्त 3 सोप्या स्टेप्स
- Published by:Priya Lad
Last Updated:
Homemade Kasuri Methi : कित्येक पदार्थांची चव वाढवणारी कसुरी मेथी बहुतेक लोक बाजारातून खरेदी करतात. पण घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ती बनवता येऊ शकते.
advertisement
1/5

दाल मखनी, पनीरची भाजी असे कित्येक पदार्थ आहेत, ज्यांच्यामध्ये चिमूटभर कसुरी मेथी टाकली की त्यांची चव वाढते. सामान्यपणे आपण ती बाजारातून खरेदी करतो, पण तुम्हाला माहित आहे का की घरी बनवलेली कसुरी मेथी दुकानातून मिळवलेल्या कसुरी मेथीपेक्षाही अधिक सुगंधी आणि शुद्ध असते. फक्त तीन टप्प्यांत कसुरी मेथी बनवून तुम्ही ती वर्षभर साठवून ठेवू शकता.
advertisement
2/5
पहिली स्टेप म्हणजे सगळ्यात आधी ताजी मेथीची पानं घ्या. पानं पूर्णपणे हिरवी आहेत याची खात्री करा. जाड देठ काढून टाका आणि फक्त कोवळी पाने आणि पातळ फांद्या ठेवा. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा. धुतल्यानंतर जास्तीचं पाणी काढून टाकण्यासाठी चाळणीत ठेवा.
advertisement
3/5
दुसरी स्टेप वाळवण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची. मेथी नेहमी सुती कापडावर पसरवून पंख्याच्या हवेखाली किंवा सावलीच्या ठिकाणी वाळवा. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नका. नाहीतर त्याचा रंग गडद होईल आणि सुगंध कमी होईल. वाळवताना थोडे मीठ शिंपडल्याने त्याचा हिरवा रंग टिकून राहतो. कापडावर वाळवून 2 ते 3 दिवसांत पानं पूर्णपणे कुरकुरीत होतील.
advertisement
4/5
तिसरी स्टेप साठवण्याची. जेव्हा पाने हातांनी कुस्करून चुरगळू लागतात तेव्हा कसुरी मेथी तयार. ती हातांनी हलकेच कुस्करून घ्या. हवाबंद काचेच्या बरणीत ठेवा. वर्षानुवर्षे खराब होणार नाही. फक्त ती काढताना कोरड्या हातांनी काढा.
advertisement
5/5
बाजारातून खरेदी केलेल्या मेथीमध्ये अनेकदा धूळ किंवा भेसळ असू शकते. पण घरी बनवलेली ही कसुरी मेथी खूप सुगंधी असते. स्वस्त आणि हंगामी मेथी वापरून तुम्ही भरपूर कसुरी मेथी बनवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Kasuri Methi : सुगंधी कसुरी मेथी घरीच कशी बनवायची? फक्त 3 सोप्या स्टेप्स