Papada Recipe : उन्हाळ्यात गेलीये तोंडाची चव, नाश्त्याला बनवा खास विदर्भ स्पेशल पापडा, संपूर्ण रेसिपी
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
अगदी झटपट तयार होणारा पदार्थ आहे. पापडा कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी सारिका पापडकर यांनी दिली आहे.
advertisement
1/7

उन्हाळ्यामध्ये नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही खास पापडा बनवू शकता. अगदी झटपट तयार होणारा पदार्थ आहे. पापडा कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी सारिका पापडकर यांनी दिली आहे.
advertisement
2/7
पापडा बनवण्यासाठी आपल्याला पापड, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कैरी, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, मोहरी, धनिया पावडर, तेल हे साहित्य लागेल.
advertisement
3/7
पापडा बनवण्याची कृती : सुरुवातीला कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे गरम झाले की त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की, त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे.
advertisement
4/7
यानंतर कांदा हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता आणि कांदा थोडा लालसर झाला की यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकून घ्यायचे आहे. दोन मिनिट हा मसाला शिजल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कैरीचे बारीक काप टाकून घ्यायचे आहेत.
advertisement
5/7
हे सर्व टाकून झाल्यानंतर मसाला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. मसाला शिजत असताना दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे आहे. पापड्यामध्ये थंड पाणी वापरल्यास पापडा हा मोकळा होत नाही. यामुळे आपल्याला पापड्यामध्ये गरम पाणी वापरणे गरजेचे आहे. पाच ते दहा मिनिटांनंतर टोमॅटो शिजलेले असतील. त्यात पापडा टाकून घ्यायचा आहे. पापडा टाकून घेतल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडा भाजून घ्यायचा आहे.
advertisement
6/7
आता यामध्ये गरम झालेले पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी हे प्रमाणातच टाकून घ्यायचे आहे पाणी टाकल्यानंतर पापडा मिक्स करायचा आणि त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्यायचा आहे.
advertisement
7/7
यानंतर हा पापडा शिजलेला असेल. यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून झाली की पापडा खाण्यासाठी तयार होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Papada Recipe : उन्हाळ्यात गेलीये तोंडाची चव, नाश्त्याला बनवा खास विदर्भ स्पेशल पापडा, संपूर्ण रेसिपी