Raaka : राक्षसासारखे हात आणि भयानक चेहरा! कोण आहे हा अभिनेता, ओळखलंत का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Raaka Film Poster : सोशल मीडियावर एखादा भयानक प्राणी किंवा राक्षसाच्या हाताचा फोटो व्हायरल झाला. आता त्याचा चेहराही दाखवण्यात आला आहे, तो एका प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे.
advertisement
1/7

सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत होतं, अस्वलासारखा केसाळ हात आणि त्यावर मोठमोठी नखं. AA22xA6 अशा नावाने हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.
advertisement
2/7
एका फिल्मचं हे पोस्टर. हात पाहिला तर तर तो एखाद्या खतरनाक प्राण्याचा किंवा राक्षसाचा वाटावा असा आहे. हा हात कुणाचा असा प्रश्न अनेकांना पडला.
advertisement
3/7
भयानक हातानंतर आता ज्याचा हा हात आहे, त्याचा चेहराही दाखवण्यात आला आहे. जितका हा हात भयानक तितकाच चेहराही भयंकर आहे.
advertisement
4/7
AA22xA6 अशा नावासह लाँच करण्यात आलेलं हे फिल्मचं पोस्टर. फिल्मचं नावही आता सांगण्यात आलं आहे. ही फिल्म आहे राका.
advertisement
5/7
या पोस्टरमधील खतरनाक हात आणि भयानक चेहरा आहे तो अभिनेता अल्लू अर्जुनचा. 8 एप्रिलला त्याच्या बर्थडेच्या निमित्ताने त्याच्या नव्या फिल्मचं हे पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
advertisement
6/7
राका फिल्ममधील अल्लू अर्जुनचा हा फर्स्ट लूक पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आपल्या स्टायलिश स्टारडमसाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जुन या चित्रपटात एका पूर्णपणे वेगळ्या आणि भीतीदायक अवतारात दिसला आहे.
advertisement
7/7
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली करत आहेत. 'राका' हा एक बिग-बजेट अॅक्शन थ्रीलर असून तो हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, उर्दू आणि बंगाली अशा 7 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. फिल्ममध्ये अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. फिल्मची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Raaka : राक्षसासारखे हात आणि भयानक चेहरा! कोण आहे हा अभिनेता, ओळखलंत का?